Mohit Kamboj: “मोहित कंबोज खाऊन खाऊन फुगलेत”, अमोल मिटकरी यांची सडकून टीका

| Updated on: Aug 22, 2022 | 12:49 PM

Amol Mitkari: मोहित कंबोज यांनी रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो या कंपनीबद्दल आपण अभ्यास करत असल्याचं सांगितलं आहे. त्यावर आता राष्ट्रवादीचे विधान परिषद आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलंय.

Mohit Kamboj: मोहित कंबोज खाऊन खाऊन फुगलेत, अमोल मिटकरी यांची सडकून टीका
Follow us on

मुंबई : मोहित कंबोज वारंवार राष्ट्रवादीला इशारा देत आहेत. गैरव्यवहाराच्या आरोपाखाली राष्ट्रवादीतील नेत्यांची चौकशी होणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय. आज त्यांनी रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या बारामती अॅग्रो या कंपनीबद्दल आपण अभ्यास करत असल्याचं सांगितलं आहे. त्यावर आता राष्ट्रवादीचे विधान परिषद आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी प्रत्युत्तर दिलंय. “मोहित कंबोज खाऊन खाऊन फुगलेत”, असं त्यांनी म्हटलंय. “मोहित कंबोज (Mohit Kamboj) हे खाऊन खाऊन फुगलेत. त्यांनी ट्विट करण्यापेक्षा अजितदादांसारखा कुपोषित बालकांच्या गावचा दौरा करावा. म्हणजे ते कमी होतील. आम्ही ठरवलंय की या असल्या ट्विटला प्रतिक्रिया द्यायची नाही, यामागचे खरे कलाकार कोण हे सगळ्यांनाच माहीती आहे, असं मिटकरी म्हणालेत.

हे सुद्धा वाचा

माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यानंतर राष्ट्रवादीचा आणखी एक बडा नेता अडचणीत येणार असल्याचं मोहित कंबोज यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आज त्यांनी राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधलाय. “बारामती ॲग्रो लिमिटेड कंपनीचा मी सखोल अभ्यास करतोय. त्या संदर्भातील अधिकचे अपडेट लवकरच देईल”, असं ट्विट कंबोज यांनी केलं आहे. त्यामुळे कंबोज यांनी काही दिवसांआधी इशारा केलेला ‘राष्ट्रवादीचा बडा नेता’ रोहित पवार आहेत का? असा प्रश्न विचारला जातोय.

कंबोज यांचा राष्ट्रवादीला इशारा

मोहित कंबोज यांनी ट्विटरच्या माध्यमातूव राष्ट्रवादीवर निशाणा साधलाय. “माझं हे ट्विट सेव्ह करुन ठेवा! अनिल देखमुख, नवाब मलिकांपाठोपाठ आता राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याची बारी आहे. लवकरच हा नेता मलिक, देशमुखांच्या भेटीला जाणार आहे. तेव्हा जेलवारीसाठी तयार राहा!”, असं सूचक इशारा देणारं ट्विट मोहित कंबोज यांनी केलंय. “हर हर महादेव! अब तांडव होगा!”, असंही ट्विट त्यांनी केलंय. त्यामुळे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची आजच चौकशी होण्याची शक्यता आहे. त्यांच्या या ट्विटने जेलमध्ये जाणारा राष्ट्रवादीचा पुढचा नेता कोण असा प्रश्न चर्चेत आला होता. त्यांनी आज एक ट्विट करत रोहित पवार तो पुढचा नेता असू शकतो, असा इशारा दिलाय.