पुणे: राज्यमंत्री दत्तात्रय भरणे ॲक्शन मोड मध्ये असल्याचे पहावयास मिळत आहे, कारण माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे खंदे समर्थक व सध्या पाटील याच्यापासून अलिप्त असलेल्या शहा कुटुंबाची त्यांच्या घरी जावून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यानी तब्बल एक तास चर्चा केली आहे.. त्यामुळे भविष्यात इंदापूर मध्ये मोठा राजकीय भूकंप होतोय की क़ाय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे..
काही दिवसांपूर्वी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या चुलत बंधुचा राष्ट्रवादी मध्ये प्रवेश घडवत राज्यमंत्री भरणे यानी हर्षवर्धन पाटील यांना मोठा धक्का दिला होता.त्यानंतर भरणे यांनी इंदापूर अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष, कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक,नगरसेवक भरत शहा व इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा यांची त्यांच्या निवासस्थानी जावून भेट घेतली. गेल्या काही दिवसांपूर्वी शहा कुटुंबियांतील भरत शहा यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या सर्व संस्थातील पदांचा अचानक राजीनामा दिला होता, त्यामुळे शहा कुटुंब हे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर नाराज असल्याची चर्च्या इंदापूर तालुक्यात आहे.. शहा कुटुंबाकड़ें सध्या इंदापूर शहरातील नगराध्यक्ष हे महत्वाचे पद आहे आणि शहरात ही शहा कुटुंबाना मानणारा मोठा वर्ग आहे..
शहा कुटुंब व हर्षवर्धन पाटील यांच्यात काय धूसपुस झाली आहे हे तालुक्याला माहिती नाही, मात्र शहा कुटुंब पाटील यांच्या पासून सध्या अलिप्त असल्याचे पक्की माहिती आहे. मात्र, यावर बोलण्यास कोणी तयार नाही..असे चित्र असताना राज्यमंत्री भरणे यानी शहा कुटुंबाची अचानक भेट घेतली, या भेटीत जवळपास एक तास चर्चा झाली.. सदरच्या भेटचा पूर्ण तपशील समजला नसला तरी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहा बंधूंना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याचे खुले निमंत्रण दिल्याची खात्रीलायक सूत्रांकडून माहिती आहे.
राज्यमंत्री भरणे यानी चार दिवसांपूर्वी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे चुलत बंधूचा राष्ट्रवादी मध्ये प्रवेश घडवत पाटील यांना मोठा धक्का दिला होता.. त्यामुळे अगोदरच तालुक्यातील सध्याच्या होत असलेल्या वेगवान घडामोडी पहाता अनपेक्षित गाठीभेटींमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आगामी काळात इंदापूर नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत.तसेच सहकारी साखर कारखान्याच्या देखील निवडणुका होणार आहेत.यामुळे भरणे सध्या ॲक्शन मोडमध्ये असून, भरणे पुन्हा एकदा पाटील यांना मोठा धक्का देवून इंदापूर मध्ये राजकीय भूकंप करता कि क़ाय? या कड़ें इंदापूर तालुक्याचे लक्ष आहे..
इतर बातम्या:
निलंबनाच्या कारवाईविरोधात भाजपच्या 12 आमदारांची सर्वोच्च न्यायालयात धाव, 12 आमदारांच्या 4 याचिका!
लोकल प्रवासासाठी मुंबईकर जनताच 2 ऑगस्टपासून सविनय नियमभंग करेल, भाजपचा ठाकरे सरकारला इशारा
(NCP Leader Dattatray Bharane visit Shah Family this create political turmoil in Indapur Politics)