नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस आणि माजी खासदार डी. पी. त्रिपाठी (ncp leader dp tripathi passed away) यांचे वयाच्या 67 व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली. डी. पी. त्रिपाठी (ncp leader dp tripathi passed away) हे राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय पातळीवरील मोठे नेते होते. त्यांच्या निधनामुळे पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे.
डी. पी. त्रिपाठी राष्ट्रवादी पक्षाचे संस्थापक सदस्य होते. राष्ट्रवादी पक्षाच्या स्थापनेपासून ते पक्षात असून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. त्यांचा जन्म 29 नोव्हेंबर 1952 रोजी उत्तर प्रदेशमधील सुल्तानपूर येथे झाला. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण हे दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) झाले असून ते जेएनयू विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष होते. त्यांनी काँग्रेस पक्षातून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. मात्र, काही वर्षांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विरोधात जात त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस या नव्या पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून ते राष्ट्रवादी पक्षात आहेत. डी. पी. त्रिपाठी यांच्या निधनाची माहिती मिळताच शरद पवार यांनी ट्विटरवर दु:ख व्यक्त केले. ‘त्रिपाठी यांच्या निधनामुळे माझे वैयक्तिक नुकसान झाले आहे’, असे शरद पवार म्हणाले.
He has been with us since the establishment of the Nationalist Congress Party and played a very important role at the national level. His demise is a personal loss to me. May his soul rest in peace!
— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 2, 2020
Saddened to hear about the demise of our NCP General Secretary Shri D. P. Tripathi ji. He was a scholar and a perfect blend of diligence and intelligence in politics. A firm voice who took a stand for my party as a Spokesperson and General Secretary. pic.twitter.com/7rtuxfeCT5
— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 2, 2020
डी. पी. त्रिपाठी यांच्या निधनाची बातमी कळताच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर दु:ख व्यक्त केले. ‘डी. पी. त्रिपाठी यांच्या निधनाची माहिती मिळाल्यानंतर फार वाईट वाटले. ते राष्ट्रवादीचे सरचिटणीस होते. ते आमच्या सर्वांचे मार्गदर्शक होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली त्यादिवशी त्यांनी केलेले मार्गदर्शन आयुष्यभर लक्षात राहील. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो’, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
Deeply Saddened to hear about the demise of Shri.D.P Tripathi Ji. He was the General Secretary of @NCPspeaks, and a guide and mentor to all of us. We will miss his wise counsel and guidance which he had given us from the day NCP was established. (1/2)
— Supriya Sule (@supriya_sule) January 2, 2020