जळगाव : ओबीसी आरक्षण पूर्ववत करुन न दिल्या राजकीय संन्यास घेईन अशी गर्जना करणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर महाविकास आघाडीचे (Maha vikas Aaghadi) नेते हल्लाबोल करत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut), काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी फडणवीसांवर निशाणा साधला. (NCP leader Eknath Khadse attacks on BJP leader Devendra Fadnavis over his statement about Political retirement)
फडणवीस यांनी राजकारणातून संन्यास घेऊ नये, ते विरोधी पक्षनेते म्हणून उत्तम काम करत आहेत, त्यांनी 5 वर्षे सरकारला सूचना कराव्यात, असा सल्ला एकनाथ खडसे यांनी दिला.
देवेंद्र फडणवीस वारंवार अशा घोषणा करतात. वेगळा विदर्भाच्या मुद्द्यावर त्यांनी आपण लग्न करणार नाही, अशी भीष्मप्रतिज्ञा केली होती. पण त्यांनी लग्न केले. असा प्रकार आपण पुराणात पाहिला आहे. विश्वामित्रने ब्रम्हचर्य भंग करून मेनकेशी लग्न केले होते. तसा हा प्रकार आहे. त्यानंतर फडणवीस यांनी राष्ट्रवादीशी युती करणार नाही, असे सांगितले होते. पण पहाटे शपथ घेतली. आता ते सत्ता दिली तर ओबीसींना आरक्षण मिळवून देऊ म्हणतात, सत्ता नसेल तर मदत करणार नाही, असे वाटते, असं एकनाथ खडसे म्हणाले.
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची दुटप्पी भूमिका आहे. गेल्या निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी आरक्षणाचा अध्यादेश काढला होता पण ती फसवणूक होती. जोपर्यंत जनगणनेचा डाटा उपलब्ध होत नाही, तोपर्यंत अध्यादेशाला महत्त्व नाही, हे फडणवीस यांना माहिती होते. अजूनही वेळ गेलेली नाही. केंद्र सरकारकडून डाटा आणला तर राज्य सरकार त्यावर काम करू शकेल. पण केंद्राकडून डाटा मिळू द्यायचा नाही, आणि ओबीसींचे आम्हीच पाठीराखे असे म्हणायचे ही दुटप्पी भूमिका फडणवीस यांची आहे, असा हल्लाबोल एकनाथ खडसे यांनी केला.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे लढवय्ये नेते आहेत. त्यांचं राजकीय भविष्य उज्ज्वल आहे. त्यांना संन्यासाची भाषा शोभत नाही. ते फकीर होण्याची भाषा करत असतील तर मी स्वत: त्यांची भेट घेईन, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली.
संबंधित बातम्या
“फडणवीस म्हणाले होते, वेगळा विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नाही, त्याचं काय झालं?”
देवेंद्र फडणवीसांची महाराष्ट्राला गरज, त्यांचं भविष्य उज्ज्वल, मी स्वत: त्यांना भेटेन : संजय राऊत