मुंबई : शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्री असलेले तानाजी सावंत(Tanaji Sawant) यांनी मराठा आरक्षणावरुन विरोधकांनर निशाणा साधताना एक वादग्रस्त वक्तव्य(Controversial statement) केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन चांगलाच वाद पेटला तर मराठा समाजानेही नाराजी व्यक्त केली. आता राष्ट्रवादीच्या नेत्याने तानाजी सावंत यांना थेट धमकीच दिली आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस सुरेश पाटील यांनी आरोग्या मंत्री असलेले तानाजी सावंत यांना डिवचले आहे. पाटील यांनी सावंत यांना मारण्याची भाषा केली आहे.
मराठा समाजाबाबत चुकीचं बोलला तर भर चौकात मारू. असा थेट इशाराच पाटील यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना दिला आहे.
उस्मानाबादमध्ये हिंदुत्वगर्जना कार्यक्रमात बोलताना तानाजी सावंत यांनी यांनी मराठा आरक्षणावरुन विरोधकांनर निशाणा साधताना एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. सत्तांतर झाल की लगेच विरोधकांना मराठा आरक्षणाची खाज सुटली आहे असं तानाजी सावंत म्हणाले होते.
यांना आरक्षण पाहिजे. आता म्हणतात ओबीसी मधून पाहिजे. उद्या म्हणतील एस सी मधून पाहिजे याचा सगळा करता करविता कोण हे सगळ्यांना चांगल माहीत असं त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला होता.
ज्या समितीला मराठ्यांना आरक्षण नको आहे अशी समिती त्या सरकारने स्थापन केली होती. त्यामुळे आरक्षण मिळाले नाही. आरक्षणासंदर्भात टिकाऊ आरक्षणाची मागणी असल्याचेही तानाजी सावंत यावेळी म्हणाले होते.