मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात एम्सचा रिपोर्ट समोर आल्यानंतर महाविकासआघाडीने भाजपवर हल्लाबोल केला आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपास यांनी देखील भाजपच्या आयटी सेलनेच महाविकासआघाडी आणि मुंबई पोलिसांची बदनामी केल्याचा आरोप केला आहे (Mahesh Tapase on Facebook Twitter fake account and BJP). यावेळी महेश तपासे यांनी फेसबुक आणि ट्विटरने फेक अकाऊंटचे मालक कोण आहेत? आणि हे फेक अकाऊंट कुठल्या आयपी अॅड्रेसवरुन करण्यात आले याची माहिती देण्याची मागणी केली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
महेश तपासे म्हणाले, “सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात फेसबुक आणि ट्विटरवर 80 हजार फेक अकाऊंट खोलण्यात आले. यातून सरकार आणि मुंबई पोलिसांची बदनामी करण्यात आली. मंत्र्यांची बदनामी करुन बिहारच्या निवडणूकीत राजकीय फायदा होईल यासाठी हे सर्व अकाऊंट खोलण्यात आल्याचा पर्दाफाश मिशीगन युनिव्हर्सिटीच्या नामांकित लोकांनी तयार केलेल्या अहवालात केला आहे.”
“या फेक अकाऊंट्समार्फत सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू हा आत्महत्या नसून हत्याच असल्याच्या अनेक दिशाभूल करणाऱ्या पोस्टस् व्हायरल करण्यात आल्या. याबाबतचा धक्कादायक खुलासा अमेरिकेतील मिशीगन विद्यापीठाच्या रिसर्च अहवालातूनही करण्यात आला आहे,” अशी माहिती महेश तपास यांनी दिली.
या फेक अकाऊंट्समार्फत सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू हा आत्महत्या नसून हत्याच असल्याच्या अनेक दिशाभूल करणाऱ्या पोस्टस् व्हायरल करण्यात आल्या. याबाबतचा धक्कादायक खुलासा अमेरिकेतील मिशीगन विद्यापीठाच्या रिसर्च अहवालातूनही करण्यात आला आहे, अशी माहिती @maheshtapase यांनी दिली. pic.twitter.com/KpsKyylkse
— NCP (@NCPspeaks) October 6, 2020
“फेसबुक आणि ट्विटरने फेक अकाऊंटचे मालक कोण? हे जाहीर करावं”
महेश तपास म्हणाले, “सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात भाजपने आणि त्यांच्या आयटी सेलने महाविकास आघाडी आणि मुंबई पोलिसांना बदनाम केल्याचं आणि त्याचा फायदा भाजपला झाल्याचं मिशीगन युनिव्हर्सिटीच्या अहवालात नमूद आहे. यातून भाजपनेच आयटी सेलच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारला आणि मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचं स्पष्ट होते.”
केंद्र सरकारने एखाद्या खटल्याचा किंवा प्रकरणाचा न्यायालयीन तपास सुरु असताना कोणताही मीडिया ट्रायल होवू नये, असा कायदा करावा, अशीही मागणी महेश तपासे यांनी यावेळी केली.
हेही वाचा :
Facebook ला जाहिरात देण्यात भाजप सर्वात पुढे, टॉप 10 मध्ये काँग्रेस-AAP चाही समावेश
‘फेसबुकच्या द्वेषपूर्ण पोस्ट प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा’, काँग्रेसचं थेट मार्क झुकरबर्गला पत्र
Mahesh Tapase on Facebook Twitter fake account and BJP