पुणे भाजपही पंतप्रधान मोदींचा प्रॉपर्टी विकण्याचा वारसा जपतोय, राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांची टीका

| Updated on: Jun 17, 2021 | 10:58 PM

पंतप्रधानांचाच वारसा जपत महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपने पुणे महानगरपालिकेच्या अनेक प्रॉपर्टी विकण्याचा सपाटा लावल्याचा आरोप जगताप यांनी केलाय.

पुणे भाजपही पंतप्रधान मोदींचा प्रॉपर्टी विकण्याचा वारसा जपतोय, राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांची टीका
पुणे महापालिका
Follow us on

पुणे : पंतप्रदान नरेंद्र मोदी यांनी ज्याप्रमाणे देशातील अनेक कंपन्या विकायला काढल्या आहेत. त्यातीच पुनरावृत्ती पुणे भाजप करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे. पंतप्रधानांचाच वारसा जपत महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपने पुणे महानगरपालिकेच्या अनेक प्रॉपर्टी विकण्याचा सपाटा लावल्याचा आरोप जगताप यांनी केलाय. जगताप यांनी काही दिवसांपूर्वी भाजपच्या कारभारावर टीका करताना आगामी निवडणुकीत पुणे महापालिकेलीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल असा दावा केला आहे. (Prashant Jagtap’s serious allegation on Pune BJP)

गोरगरीबांचे नाव पुढे करून स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने आणि सभागृह नेते गणेश बीडकर हे एकप्रकारे इस्टेट एजंट असल्याप्रमाणेच काम करत असल्याची टीका जगताप यांनी केलीय. कोथरूडचे आमदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांच्या मर्जीनेच हा कारभार सुरू असल्याची शक्यताही जगताप यांनी व्यक्त केली आहे. 200 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्यासाठी म्हणून महानगरपालिकेच्या मालकीच्या 1 हजार 260 फ्लॅट विक्रीचा निर्णय घेण्यात आलाय. गरिबांना फ्लॅट देण्याच्या आडून सत्ताधारी भाजपचा हा सुमारे दोन हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा प्रयत्न आहे, असा आरोप जगतापांनी केलाय. पुणेकरांची फसवणूक करण्याचा भाजपचा हा प्रयत्न हाणून पाडल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस गप्प बसणार नाही, असा इशाराही जगताप यांनी दिलाय.

नागरिकांच्या डेटा चोरीचाही आरोप

पुणे शहरात भाजप नगरसेवक लसीकरणाच्या नावाखाली नागरिकांचा डेटा चोरत असल्याचा गंभीर आरोप प्रशांत जगताप यांनी यापूर्वी केला होता. पुणे शहर तथा देशभरात लसीकरण मोहिम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. लसीकरणासाठी प्रत्येक नागरिकाचे केंद्र सरकारच्या कोविन अॅपमध्ये ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन केले जात आहे. लसीकरणासाठी गोळा करण्यात आलेली नागरिकांची माहिती पुणे महानगरपालिका प्रशासन आणि केंद्र सरकारच्या प्रशासनाकडे सुरक्षितरित्या जतन असणे हे अपेक्षित आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या गोपनीय कायद्यानुसार हा डेटा कुठल्याही राजकीय पक्षाला व्यवसायिक आणि आस्थापनांना देता येत नाही. पण संबंधित डेटा भाजपच्या काही नगरसेवकांना देण्यात आल्याचा आरोप प्रशांत जगताप यांनी केला होता.

पुणे महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार- जगताप

येत्या महापालिका निवडणुकीत पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवणार, असा निर्धार राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे. आगामी पुणे महापालिका निवडणुकीत पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचाच महापौर होईल, असा विश्वास जगताप यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 22 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना जगताप यांनी हा दावा केलाय. सत्ताधारी भाजपच्या कामावरती पुणेकरांमध्ये असंतोष आहे. पुणेकर आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवतील. अजित पवारांच्या नेतृत्वात महापालिका जिंकू असा विश्वास शहराध्यक्ष जगताप यांनी व्यक्त केला.

संबंधित बातम्या :

मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, SEBC प्रवर्गाऐवजी EWS किंवा खुला प्रवर्ग निवडावा लागणार, MPSCचं परिपत्रक

देशविरोधी शक्तींच्या सुरात सूर मिसळू नका; चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला इशारा

NCP leader Prashant Jagtap’s serious allegation on Pune BJP