सत्ता गेल्यानंतर तुमच्या वृत्तीतला बदल ‘वर्षा’ सोडतानाही पाहिला, रुपाली चाकणकरांचा अमृता फडणवीसांवर निशाणा

| Updated on: Aug 05, 2020 | 3:50 PM

पोलीस बांधव तेच आहेत, ब्रीद तेच आहे आणि कामगिरीही अभिमानास्पद आहे, बदललीय ती फक्त तुमची दृष्टी, असा टोला रुपाली चाकणकर यांनी लगावला.

सत्ता गेल्यानंतर तुमच्या वृत्तीतला बदल वर्षा सोडतानाही पाहिला, रुपाली चाकणकरांचा अमृता फडणवीसांवर निशाणा
Follow us on

मुंबई : मुंबई पोलिसांवर टीका करणाऱ्या विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना राष्ट्रवादीतूनही उत्तर देण्यात आले आहे. “सत्ता गेल्यानंतर तुमच्या वृत्तीमधला हा बदल आम्ही वर्षा बंगला सोडतानाही पाहिला आहे” असा घणाघात राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केला आहे. (Rupali Chakankar answers Amruta Fadnavis criticism on Mumbai Police)

“अमृताजी, देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री असताना हेच पोलीस बांधव सेवा देत होते आणि आजही तेच सेवा बजावत आहेत. पोलीस बांधव तेच आहेत, ब्रीद तेच आहे आणि कामगिरीही अभिमानास्पद आहे, बदललीय ती फक्त तुमची दृष्टी” असा टोला रुपाली चाकणकर यांनी लगावला.

“सत्ता गेल्यानंतर तुमच्या वृत्तीमधला हा बदल आम्ही ‘वर्षा’ बंगला सोडतानाही पाहिला आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या पोलीस बांधवांवर आपण अविश्वास दाखवत आहात त्यांनी बॉम्बस्फोट, पूर, 26/11 हल्ला आणि आत्ताच्या कोरोनाच्या संकटामध्ये मुंबईला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले आहे.” अशी प्रतिक्रियाही चाकणकर यांनी दिली आहे. रुपाली चाकणकर यांनी ट्विटरवर सध्या महाराष्ट्र पोलिसांचा डीपी ठेवला आहे. त्याचप्रमाणे गृह खातेही राष्ट्रवादीकडे असल्याने पक्षातून उत्तर येण्याची अपेक्षा होती.

अमृता फडणवीस काय म्हणाल्या होत्या?

“बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण ज्या पद्धतीने हाताळले जात आहे – मला वाटते मुंबईने माणुसकी गमावली आहे. निर्दोष, स्वाभिमानी नागरिकांसाठी जगणे यापुढे सुरक्षित वाटत नाही” अशा आशयाचे ट्वीट अमृता फडणवीस यांनी केले होते. (Rupali Chakankar answers Amruta Fadnavis criticism on Mumbai Police)

अनिल परब यांचा निशाणा

“पाच वर्षात फडणवीस सरकारने पोलिसांची स्तुती केली, सतत पोलिसांना शाबासकी दिली, पोलिसांच्या पाठिमागे ठामपणे उभे राहिले. पण, केवळ खुर्ची गेली म्हणून त्यांना असुरक्षित वाटत असेल तर त्यांच्यासाठी हे राज्य सोडून जाणं हाच एक उपाय असू शकतो. मुंबईतील असा कुठला नागरिक म्हणला आहे की, आम्ही असुरक्षित आहोत? अमृता फडणवीस यांना असुरक्षित वाटण्यासारखं काय घडलंय? त्याच पोलिसांची सुरक्षा घेऊन आज त्या फिरत आहेत”, अशी टीका अनिल परब यांनी अमृता फडणवीसांवर केली

वरुण सरदेसाई यांचे उत्तर

“मॅडम, तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय याच मुंबई पोलिसांची सिक्युरिटी कव्हर (पोलिस संरक्षण) घेऊन त्यांच्यावर इतके नीच आरोप करता?? सोडून द्या की सिक्युरिटी कव्हर भरोसा नसेल तर !!” अशा शब्दात युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी आव्हान दिलं होतं.

संबंधित बातम्या :

छुपाएं कुछ छुपता नहीं, सुशांतच्या आत्महत्येबाबत अमृता फडणवीसांकडून आणखी एक ट्विट

असुरक्षित वाटत असेल तर फडणवीसांनी राज्य सोडणे हाच उपाय : शिवसेना

मिसेस फडणवीसांच्या ट्विटवर देवेंद्र फडणवीस म्हणतात…

भरोसा नसेल तर पोलिस सिक्युरिटी सोडा, वरुण सरदेसाईंचे अमृता फडणवीसांना प्रत्युत्तर

(Rupali Chakankar answers Amruta Fadnavis criticism on Mumbai Police)