मुंबई : राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी मुंबई अध्यक्ष आणि माजी गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर (Sachin Ahir) शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश करणार आहेत. सचिन अहिर (Sachin Ahir) यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक आणि अमरावती आमदारही शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सकाळी 11 ते 12 वाजण्याच्या सुमारास ‘मातोश्री’वर पत्रकार परिषद घेणार आहेत. यात ते सचिन अहिर यांच्या पक्षप्रवेशाची घोषणा करतील, असे बोलले जात आहे.
सचिन अहिर हे मुंबई राष्ट्रवादीचा बडा चेहरा आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी मंत्रिपदही भूषवलं आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारमध्ये ते गृहनिर्माण राज्यमंत्री होते. राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे. सचिन अहिर यांच्यामागे तरुणांची मोठी फळी असल्याचं दरवर्षी दहिहंडी उत्सवाच्या निमित्ताने पाहायला मिळतं. त्यामुळे सचिन अहिर यांनी राष्ट्रवादी सोडली तर ते पक्षासाठी मोठं भगदाड असेल. सचिन अहिर यांच्या या प्रवेशाला सचिन अहिर युवा फाऊंडेशनने पाठिंबा दिल्याच्या पोस्टही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षातील इनकमिंग-आऊटगोईंग सुरु आहे. विशेषत: सत्ताधारी भाजप-शिवसेनेमध्ये येणाऱ्यांचा लोंढा वाढत चालला आहे. राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य अहमदनगर जिल्ह्यातील अकोलेचे आमदार वैभव पिचड (MLA Vaibhav Pichad) यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर वैभव पिचड (MLA Vaibhav Pichad) हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जातंय. मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यासोबत वैभव पिचड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भूजबळ यांच्याही शिवसेना प्रवेशाची चर्चा सुरु होती. मात्र, स्वतः भूजबळ यांनी आपण शिवसेनेत प्रवेश करणार नसल्याचे टीव्ही 9 ला सांगत या चर्चेला पूर्णविराम दिला.
दरम्यान, गेल्या काही महिन्यात राष्ट्रवादीच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केलाय. शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य असलेले जयदत्त क्षीरसागर यांनीही लोकसभा निवडणुकीनंतर शिवबंधन बांधलं होतं. लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या आदल्या दिवशीच राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे बीड जिल्ह्यातील महत्त्वाचे नेते जयदत्त क्षीरसागर यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांची मंत्रीमंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्रिपदीही वर्णी लागली. त्यांना राज्य मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेच्या कोट्यातून मंत्रिपद मिळालं. आणखी अनेक आमदार भाजपात येणार असल्याचा दावा शिवसेना आणि भाजपकडून कायम केला जातोय.
सचिन अहिर कोण आहेत?
संबंधित बातम्या
विखेंकडून आमदारकीचा राजीनामा, आता काँग्रेसला खिंडार पाडून बाहेर पडणार
आमदार अब्दुल सत्तार आपल्या पक्षात नको, भाजपमधून तीव्र विरोध सुरु
“विखेंसोबत 10 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार”
“विखेंसह काँग्रेसचे सात आमदार आणि हजारो लोकप्रतिनिधी, पदाधिकारी भाजप प्रवेश करतील”