मुंबई : राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. धनंजय मुंडे यांचे काही कर्मचारीही कोरोनाबाधित असल्याची माहिती आहे. धनंजय मुंडे यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. (NCP Minister Dhananjay Munde COVID Positive)
मुंबईत मंत्रालयाच्या समोर असलेल्या मंत्र्यांच्या बंगला परिसरात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. धनंजय मुंडे यांच्या बंगला परिसरातील कर्मचारी वस्ती असलेल्या भागातही कोरोनाचे काही रुग्ण सापडले आहेत. या कर्मचाऱ्यांमध्ये मुंडेंच्या स्वयंपाकी, मदतनीस यांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे 10 जून रोजी राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन कार्यक्रमला धनंजय मुंडे यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी ते राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांच्या संपर्कात आले होते.
हेही वाचा : अशोक चव्हाण यांची कोरोनावर मात, रुग्णालयातून डिस्चार्ज, आता होम क्वारंटाईन
धनंजय मुंडे हे बीडमधील परळीचे आमदार आहेत. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते आमदारपदी निवडून आले. ठाकरे सरकारमध्ये त्यांच्या खांद्यावर सामाजिक न्याय मंत्रिपदाची धुरा देण्यात आली.
ठाकरे सरकारमधील तिसऱ्या मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. याआधी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनाही कोरोनाची लागण झाली होती. सुदैवाने या दोन्ही मंत्र्यांनी कोरोनावर मात केली. (NCP Minister Dhananjay Munde COVID Positive)
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाचा लागण.. pic.twitter.com/G7wF1GSR8M
— महाविकास आघाडी (@MHVaghadi) June 12, 2020
संबंधित बातम्या :
मिरा भाईंदरमध्ये शिवसेना नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू
ठाण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू, आव्हाडांकडून हळहळ व्यक्त
किमान 12 तास रस्तेमार्गे प्रवास, अशोक चव्हाणांवर मुंबईत कोरोनावर उपचार!
(NCP Minister Dhananjay Munde COVID Positive)