मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे राजीनामा दिलेले बार्शीचे आमदार दिलीप सोपल (Dilip Solap) यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना (Dilip Solap) शिवबंधन बांधलं. यावेळी दिलीप सोपल यांनी शरद पवारांना सोडण्याचा गम नाही, पण हुरहूर आहे, असं सांगितलं.
दिलीप सोपल म्हणाले, “चांगलं वाटतय, 23 वर्षांनी घरवापसी झाली. तिकिटांचा विषय आला म्हणून सांगतो कार्यकर्त्यांनी, मित्रांनी मला हा निर्णय घेण्यास सांगितले म्हणून मी हा (शिवसेना प्रवेशाचा) निर्णय घेतला. शिवसेनेकडून त्याच मतदार संघातून मी निवडणूक लढवणार आहे. राष्ट्रवादीने दोनदा तिकीट नाकारलं होतं. तरी अपक्ष म्हणून निवडून आलो. सोबत होतो. शरद पवारांना सोडण्याचा गम नाही पण हुरहूर आहे”
शिखर बँकेसंदर्भात माझंही नाव आहे. मी चौकशीला सामोरं जाईन. शिवसेनेत येण्याचा निर्णय घेतल्यानंतर ही नोटीस आली. आधी नोटीस आली नाही, असं स्पष्टीकरण दिलीप सोपल यांनी दिलं.
उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
“ब्रेक के बाद -ब्रेक के बाद असे प्रवेश होत आहेत. दिलीप आमचे जुने सहकारी आहेत. काही कारणास्तव ते गेले होते, आता पुन्हा मोठ्या ताकदीने ते सेनेत येत आहेत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
दिलीप सोपल यांचा राजीनामा
बार्शीचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल (NCP MLA Dilip Sopal) यांनी दोन दिवसापूर्वी पक्षाचा तर काल आमदारकीचा राजीनामा दिला. विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती सुरुच आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचे आमदार दिलीप सोपल (NCP MLA Dilip Sopal) शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरु होती. अखेर दिलीप सोपल यांनी राजीनामा देऊन त्यावर शिक्कामोर्तब केलं. आज त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
दिलीप सोपल कोण आहेत?
संबंधित बातम्या
राष्ट्रवादीचे दिलीप सोपल, काँग्रेसचे दिलीप माने शिवसेनेत, उद्धव ठाकरे म्हणतात…
Dilip Sopal | राष्ट्रवादीला धक्के सुरुच, आमदार दिलीप सोपल यांचा राजीनामा, शिवबंधन बांधणार