बैठकीचं कोणतंही निमंत्रण नसल्यानं गैरहजर, पक्ष श्रेष्ठींना नाराजी कळवली : अमोल मिटकरी

| Updated on: Nov 21, 2020 | 4:11 PM

अकोला जिल्ह्यात शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित आघाडीच्या बैठकीला आमंत्रण नसल्याने राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

बैठकीचं कोणतंही निमंत्रण नसल्यानं गैरहजर, पक्ष श्रेष्ठींना नाराजी कळवली : अमोल मिटकरी
Follow us on

परभणी : राज्यातील पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष महाविकासआघाडी अंतर्गत एकत्रितपणे मैदानात आहेत. त्यामुळे आघाडीची ताकद वाढल्याचं बोललं जातंय. मात्र, आता या तिन्ही पक्षांमधील नाराजी नाट्य पुन्हा एकदा समोर आलं आहे. अकोला जिल्ह्यात शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित आघाडीच्या बैठकीत सर्व आमदार उपस्थित असताना केवळ राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरीच गैरहजर होते. यावर विचारले असता त्यांनी संबंधित बैठकीचं निमंत्रणच नसल्याचं सांगत नाराजी व्यक्त केली आहे (NCP MLA Amol Mitkari is unhappy on Shivsena amid Graduate Constituency Election).

महाराष्ट्रात पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका आहेत. अमरावती विभागातून महाविकास आघाडीकडून श्रीकांत देशपांडे यांना उमेदवारी देण्यात आलीय. त्यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत शुक्रवारी (21 नोव्हेंबर) अकोल्यात आले होते. या बैठकीला महाविकास आघाडीचे सर्व आमदार उपस्थित होते. पण राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी गैरहजर होते. त्यामुळे राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं होतं.

याबाबत परभणीत आलेल्या अमोल मिटकरी यांना विचारलं असता ते म्हणाले, “अकोल्याच्या बैठकीचे मला कोणतेही निमंत्रण नसल्याने मी बैठकीला उपस्थित नव्हतो. याचा अर्थ आघाडीत बिघाडी आहे, असा होत नाही.” याबाबत मी माझी नाराजी श्रीकांत देशपांडे आणि पक्ष श्रेष्टीनं कळवली असल्याचंही अमोल मिटकरी यांनी नमूद केलं.

“मी आज मुद्दाम मराठवाड्यात आलो”

“जिथे जिथे महाविकास आघाडीकडून उमेदवार दिले आहेत तिथे तिथे मी आहे. अमरावती विभागातही मी आहे, आज मी मुद्दाम मराठवाड्यात आलो आहे. सतीश चव्हाण आमचे उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारार्थ माझा 3 दिवस दौरा आहे. तसेच पुण्यातून लाड यांना उमेदवारी दिलीय. त्यांच्या प्रचारासाठी देखील मी जाणार आहे. त्यामुळे मी फक्त इथे आलो, तिथे तिथे गेलो असं नाही. मला माझा पक्ष आदेश देईल तिथे मी जाईल आणि ते माझं कर्तव्य आहे,” असं मत अमोल मिटकरी यांनी परभणीत व्यक्त केलं.

संबंधित बातम्या :

आधीच्या मुख्यमंत्र्यांचा अहंकाराशी संबंध, महाविकासआघाडीला अहंकार नाही, मिटकरींचा हल्लाबोल

काही सोंगाडे स्वतःला साधूसंत समजतात, तुम्हाला हरिपाठ पाठ आहे का सांगा, मिटकरींचा तुषार भोसलेंवर हल्लाबोल

शेलारमामा, हिंदुत्वाचे सर्टिफिकेट रेशीमबागेत मिळेल की भाजप कार्यालयात? मिटकरींनी डिवचले

व्हिडीओ पाहा :

NCP MLA Amol Mitkari is unhappy on Shivsena amid Graduate Constituency Election