“भाजपला शरद पवारांची राष्ट्रवादी चालते, पण अजित पवार…”, महायुतीतील आमदाराचा खळबळजनक गौप्यस्फोट, थेट…

| Updated on: Sep 21, 2024 | 9:57 AM

आता विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना महायुतीतील वाद चव्हाट्यावर येताना दिसत आहे. भाजपला शरद पवारांची राष्ट्रवादी चालते, पण अजित पवारांची राष्ट्रवादी चालत नाही, असा खळबळजनक आरोप महायुतीतील एका आमदाराने केला आहे.

भाजपला शरद पवारांची राष्ट्रवादी चालते, पण अजित पवार..., महायुतीतील आमदाराचा खळबळजनक गौप्यस्फोट, थेट...
शरद पवार यांचा हाबाडा, आता खेला होबे
Follow us on

Sunil Shelke Big Allegation :  येत्या काही दिवसातच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची घोषणा होणार आहे. त्यामुळे सर्वच पक्ष हे विधानसभेच्या तयारीला लागले आहेत. त्यातच यंदा विधानसभेत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढाई पाहायला मिळणार आहे. सध्या या आघाडीतील सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. जागावाटप, मुख्यमंत्रिपद, तसेच उमेदवार याबद्दल सातत्याने बैठका होत आहेत. मात्र आता विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना महायुतीतील वाद चव्हाट्यावर येताना दिसत आहे. भाजपला शरद पवारांची राष्ट्रवादी चालते, पण अजित पवारांची राष्ट्रवादी चालत नाही, असा खळबळजनक आरोप महायुतीतील एका आमदाराने केला आहे.

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच विद्यमान आमदार जोरदार तयारीला लागले आहेत. त्यातच आता मावळ विधानसभेचे अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. मावळमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी भाजपला चालत नाही, पण शरद पवारांची राष्ट्रवादी चालते, असे विधान सुनील शेळकेंनी केले आहे. मावळमध्ये एका पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.

सुनील शेळके काय म्हणाले?

सध्या मावळमध्ये भाजपचे काही पदाधिकारी हे अजित पवार हे कसे चुकीचे आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. मावळ गोळीबार अजित पवारांनी करायला लावला, अजित पवार कसे अन्याय करत आहेत, हे देखील सातत्याने दाखवले जात आहे. त्यासोबतच येत्या विधानसभेला अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करायची नाही, असंही लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. हे करत असताना मात्र राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवाराला कशाप्रकारे मदत करता येईल, याची रणनीती भाजप मावळमध्ये आखत आहे, असा आरोप आमदार सुनील शेळके यांनी केला आहे.

दरम्यान मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केलेल्या या विधानामुळे आता महायुतीत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या मावळ मतदारसंघात महायुतीकडून दोन उमेदवार विधानसभेची तयारी करत आहेत. माजी आमदार बाळा भेगडेंनी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तयारीला सुरुवात केली आहे. तर विद्यमान आमदार सुनील शेळकेंनीही मावळ मतदारसंघातूनच निवडणूक लढणार असा दावा केला आहे. त्यामुळे आता महायुतीत ही जागा कोणत्या पक्षाच्या पारड्यात जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.