नाशिक : राज्यातील सत्तांतरानंतर (Shivsena Party) शिवसेनेतून आऊटगोइंग आणि शिंदे गटात इनकमिंग असेच चित्र राहिलेले आहे. शिवसेनेच्या खासदारांपासून ते पदाधिकाऱ्यांपर्यंत अनेकांनी (Uddhav Thackeray) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. आता कुठं हे चित्र थांबले आहे. पक्ष अडचणीत असतानाच आता नाशकात मात्र दिलासा मिळाला आहे. राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे यांचे बंधू (Bharat Kokate) भारत कोकाटे यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला आहे. एकीकडे सदस्य नोंदणीला वाढता प्रतिसाद आणि दुसरीकडे पक्षामध्ये होत असलेले प्रवेश यामुळे शिवसेनेची तर ताकद वाढणार आहेच पण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आत्मविश्वासही वाढत असल्याचे कोकाटे यांच्या प्रवेशा दरम्यान दिसून आले आहे.
राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे यांचे बंधू भारत कोकाटे यांनी आता हातामध्ये शिवबंधन बांधले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सेनेत प्रवेश केला आहे. तर शिवसैनिकावर माझा विश्वास असून येथून पुढची प्रत्येक लढाई आपल्याला जिंकायची आहे आणि ते ही मर्दासारखी म्हणत त्यांनी बंडखोर आमदांवर टिका केली. प्रतिज्ञा पत्र एवढी झाली पाहिजे की भविष्यात शिवसेनेच्या नांदी लागण्याची कोणाची हिंमत झाली नाही पाहिजे असे म्हणत शिवसेनेचा भगवा कुणालाही हिसकावू देणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
शिवसेना पक्ष आपलाच हे दाखवून देण्यासाठी आता पक्षाकडून सदस्य नोंदणी सुरु आहे. एक लढाई कोर्टात तर दुसरीकडे रस्त्यावर असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी सदस्य नोंदणीचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसादही मिळत आहे. एकट्या नाशिक जिल्ह्यातून आतापर्यंत 1 लाखाहून अधिकची नोंदणी झाली आहे. सदस्य नोंदणीचा फॉर्म आणि सर्वकाही सुरळीत प्रकिया करण्याचे आवाहन ठाकरे यांच्याकडून केले जात आहे. पुन्हा केवळ फोटोच कसा म्हणून आपले सदस्य रद्द होऊ नये याची काळजी घेण्याचेही आवाहन त्यांनी केले आहे.
सध्या शिवसेना आणि शिंदे गटाकडूनही सदस्य नोंदणी ही सुरु आहे. पण शिवसेना पक्षाची नोंदणी ही थेट शिवसैनिकापर्यंत जाऊन केली जात आहे तर काहींनी यासाठी प्रोफशनल एजंट लावल्याची टिका ठाकरे यांनी शिंदे गटावर केली आहे. त्यामुळे त्यांच्यापेक्षा दसपटीने सदस्य संख्या करणे गरजेचे असल्याचे उद्धव ठाकरे यांनी प्रवेशादरम्यान कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. आता सदस्य संख्या कोणाची जास्त यावरुन शिंदे गट आणि शिवसेनेत स्पर्धा पाहवयास मिळत आहे.