नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानंतर लोकसभेत आज आपलं म्हणणं मांडलं. खासदार अमोल कोल्हे यांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला शोभणारी पहिली मागणी लोकसभेत केली. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडला पुन्हा राजधानीचा दर्जा द्या, असं अमोल कोल्हे म्हणाले.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना डॉ अमोल कोल्हे म्हणाले, “17 व्या शतकात जसे रायगड राजधानी होती, तशीच ती पूर्ववत करावी. स्टॅच्यू ऑफ युनिटीप्रमाणे ती जपायला हवी”
डॉ. अमोल कोल्हे हे छत्रपती शिवरायांच्या गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी अग्रशील आहेत. त्यांनी टीव्ही मालिका किंवा सिनेमात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिका साकारल्या आहेत. छत्रपती संभाजी महाराज या मालिकेने तर अमोल कोल्हे यांना यशाच्या शिखरावर पोहोचवलं.
नसानसात छत्रपती शिवराज, संभाजी महाराज भिनलेल्या डॉ. अमोल कोल्हे यांनी लोकसभा निवडणुकीनंतरही त्यादृष्टीनेच पावलं टाकली आहेत.
शिरुरमध्ये विजय
लोकसभा निवडणुकीत शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून लढलेल्या अमोल कोल्हे यांनी शिवसेनेचे बढे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला. राष्ट्रवादीचे केवळ 4 खासदार निवडून आले आहेत. त्यामध्ये अमोल कोल्हेंचा नंबर आहे.
संबंधित बातम्या
अमोल कोल्हे आणि राज ठाकरे यांची ‘कृष्णकुंज’वर भेट
शिवनेरीनंतर वढू-तुळापूर, संभाजी महाराजांच्या दर्शनानंतर अमोल कोल्हे म्हणाले….