कोरोना काळात राजकारण करणाऱ्यांना जागा दाखवून द्या, भगीरथ भालकेंसाठी अमोल कोल्हेंची बॅटिंग

| Updated on: Apr 15, 2021 | 9:52 AM

भारतनानांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी भगीरथदादांच्या पाठीशी एकजुटीने उभा राहा, असे आवाहन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले. (Amol Kolhe Pandharpur Mangalwedha bypoll )

कोरोना काळात राजकारण करणाऱ्यांना जागा दाखवून द्या, भगीरथ भालकेंसाठी अमोल कोल्हेंची बॅटिंग
राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे
Follow us on

मुंबई : पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. राष्ट्रवादी आणि भाजपच्या नेत्यांमध्ये निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा कलगीतुरा रंगताना दिसत आहे. “कोरोनाच्या संकट काळात राजकारण करणाऱ्या प्रवृत्तींना त्यांची जागा दाखवून देण्याची संधी आली आहे” अशा शब्दात राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी जनतेला मतदानाचे आवाहन केले. (NCP MP Dr Amol Kolhe slams BJP in Pandharpur Mangalwedha bypoll campaign)

“त्या प्रवृत्तींना जागा दाखवून देण्याची संधी”

“महाराष्ट्र कोरोनाच्या संकटातून जात आहे. या संकटकाळात जनतेच्या जीवाची पर्वा न करता केवळ आणि केवळ राजकारण कोण करतंय, हे पंढरपूर मंगळवेढ्याचीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनता पाहत आहे. अशा प्रवृत्तींना त्यांची जागा दाखवून देण्याची ही संधी निवडणुकीच्या निमित्ताने पंढरपूर मंगळवेढ्यातील सूज्ञ मतदारांना मिळाली आहे. भारतनानांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी भगीरथदादांच्या पाठीशी एकजुटीने उभा राहा” असे आवाहन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत केले.

भारतनानांवर या मतदारसंघातील जनतेने अलोट प्रेम केलं. भारतनानाही येथील जनतेला आपल्या कुटुंबातील एक घटक मानत असत. भालके कुटुंबीयांशी असणारा हा स्नेह जपत मतदार भगीरथ भालके यांना विजयी करतील, असा विश्वासही कोल्हेंनी व्यक्त केला.

अमोल कोल्हे यांचे ट्वीट

पंढरपुरात भगीरथ भालके विरुद्ध समाधान आवताडे थेट लढत

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या विरुद्ध भाजपचे उमेदवार समाधान आवताडे असा थेट सामना होत आहे. राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनामुळे ही पोटनिवडणूक लागली आहे. राष्ट्रवादीकडून भारत भालके यांचे पुत्र भरीरथ भालके यांनाच तिकीट देण्यात आलंय. तर परिचारक गटाने मंजुरी दिल्यानंतर भाजपकडून समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली गेलीय. हे दोन्ही उमेदवार तगडे असल्यामुळे ही पोटनिवडणूक अतिशय चुरशीची ठरले अशी शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जातेय.

संबंधित बातम्या :

फडणवीस पाच वर्षे तरी विरोधी पक्षनेते म्हणून टिकतील का?; जयंत पाटलांनी डिवचले

शरद पवार रुग्णालयात, सुप्रिया सुळेंचं ‘ब्रीच कँडी’च्या गेटवरुन भाषण, पंढरपूर पोटनिवडणुकीची सभा गाजवली

(NCP MP Dr Amol Kolhe slams BJP in Pandharpur Mangalwedha bypoll campaign)