Pawar Family | आजोबा आणि नातवात सुप्रिया सुळेंची मध्यस्थी, पवार कुटुंबातील वाद मिटणार?

| Updated on: Aug 13, 2020 | 8:52 PM

पवार कुटुंबात वाद सुरु असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर तोडगा काढण्यासाठी सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवार यांना सिल्वर ओकवर बोलावलं.

Pawar Family | आजोबा आणि नातवात सुप्रिया सुळेंची मध्यस्थी, पवार कुटुंबातील वाद मिटणार?
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांच्यावर (Supriya Sule Is The Mediator) केलेल्या टीकेनंतर पवार कुटुंबात एक नवा वाद उफाळून आला आहे. शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांना प्रसारमाध्यमांसमोर अपरिपक्व म्हटलं होतं. तसेच, आम्ही पार्थच्या वक्तव्याला कवडीचीही किंमत देत नाही, असंही शरद पवार म्हणाले होते. शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीत अनेक राजकीय घडामोडींना वेग आला (Supriya Sule Is The Mediator).

पार्थ पवार हे मोठा निर्णय घेणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. पवार कुटुंबात वाद उद्भवल्याची चर्चा होताच खासदार सुप्रिया सुळे यांनी मध्यस्थिची भूमिका घेत पार्थ पवारांना थेट शरद पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्वर ओकवर बोलावून घेतल्याचं सांगण्यात येत आहे.

सुप्रिया सुळेंची मध्यस्थी

पवार कुटुंबात वाद सुरु असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर तोडगा काढण्यासाठी सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवार यांना सिल्वर ओकवर बोलावलं. पार्थ पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात चर्चा झाली. पार्थ यांच्या भूमिकेमुळे पवार कुटुंबात जो कलह निर्माण झाला होता, त्यावर सुप्रिया सुळेंच्या मध्यस्थीमुळे तोडगा निघण्याची शक्यता आहे (Supriya Sule Is The Mediator).

सुप्रिया सुळेंची महत्त्वाची भूमिका महत्त्वाची

दोन दिवसांपासून सुरु असलेल्या राष्ट्रावादीच्या घडामोडींमध्ये सुप्रिया सुळे यांची भूमिका महत्त्वाची आहे. काल संध्याकाळी सिल्व्हर ओकवर झालेल्या बैठकीत अजित पवार, शरद पवार आणि जयंत पाटील यांच्यासोबत सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. त्याचबरोबर आज सुप्रिया सुळे यांनी वायसीएमआर प्रतिष्ठान येथे अगोदर शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर, मंत्रालयात अजित पवार यांची भेट घेतली. त्यानंतर संध्याकाळी पार्थ पवार सुप्रिया यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर दाखल झाले. त्यामुळे हे प्रकरण निवळण्यात सुप्रिया यांची भूमिका महत्त्वाची आहे, असं मत राजकीय विश्लेषकांकडून मांडण्यात येत आहे.

भेटीनंतर चित्र बदलेल?

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या घडामोडींमुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघालं आहे. त्यानंतर पवार कुटुंबात वाद असल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र आता पार्थ पवार आणि शरद पवार यांच्या भेटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणातील बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील. पार्थ पवार राम मंदिर आणि सुशांत प्रकरणाबाबत घेतलेल्या भूमिकांवर शरद पवारांकडे माफी मागू शकतात किंवा ते बंड पुकारु शकतात.

दरम्यान, भेटीतून, समोपचारातून प्रकरण थांबावं, असे प्रयत्न केले जात असल्याचं दिसत आहे. त्यामुळे या भेटीनंतर पार्थ पवार काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, असं मत राजकीय विश्लेषकांकडून मांडण्यात येत आहे.

शरद पवार काय म्हणाले होते?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करण्याची मागणी केली होती. त्यावर भाष्य करताना पवार म्हणाले, “माझ्या नातवाच्या बोलण्याला आम्ही कवडीचीही किंमत आम्ही देत नाही, तो इमॅच्युअर आहे. सीबीआय चौकशीबाबत बोलायचं, तर मी म्हणेन, महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलिसांवर माझा पूर्ण विश्वास आहे. पण जर कोणी म्हणत असेल, अन्य चौकशीबाबत, तर त्याला विरोध असण्याचं कारण नाही”, असं शरद पवार म्हणाले होते.

Supriya Sule Is The Mediator

संबंधित बातम्या :

नया है वह, पार्थ पवारांबाबतचा प्रश्न छगन भुजबळांनी टोलावला

पार्थ पवारच्या बोलण्याला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही : शरद पवार

अजितदादा नाराज नाहीत, शरद पवार कुटुंबप्रमुख, त्यांना प्रत्येकाला सूचना करण्याचा अधिकार : जयंत पाटील