मुंबई : “शिवसेना नसती तर भाजपचे 40-50 आमदारच असते. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन हा चेष्टेचा विषय झाला”, असा टोमणा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला (Sharad Pawar on Devendra Fadanvis) आहे. शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मॅरेथॉन अडीच तास मुलाखत घेतली. या मुलाखतीत शरद पवार यांनी फडणवीस यांना टोमणा (Sharad Pawar on Devendra Fadanvis) लगावला.
शरद पवार म्हणाले, “शिवसेना नसती तर भाजपचे 40-50 आमदारच असते. ‘मी पुन्हा येईन’ म्हणण्यामध्ये दर्प होता. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन हा चेष्टेचा विषय झाला. राजकीय नेत्याने जनतेला गृहीत धरु नये. भाजपचे ‘आता आम्हीच’ हे लोकांना आवडले नाही.”
“भाजपचे 105 आमदार जिंकण्यात शिवसेनेचे मोठे योगदान आहे. शिवसेनासोबत नसती तर 105 चा आकडा 40-50 असता. बाळासाहेबांचा विचार, कामाची पद्धत भाजपशी सुसंगत नव्हती. बाळासाहेबांची भूमिका आणि भाजपची पद्धत यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. बाळासाहेबांनी अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजनांचा सन्मान केला. बाळासाहेबांची भाजपसोबतची युती व्यक्तिसापेक्ष होती”, असंही शरद पवारांनी सांगितले.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
“कुठल्याही लोकशाहीतला नेता आपण अमरपट्टा घेऊन आलोय असा विचार करु शकत नाही. या देशातल्या मतदारांना गृहीत धरले तर तो कधी सहन करत नाही. इंदिरा गांधींसारख्या जनमानसात प्रचंड पाठिंबा असणाऱ्या व्यक्तीलासुद्धा पराभव पाहावा लागला होता. अटलबिहारी वाजपेयींसारख्या नेत्यालासुद्धा पराभव पाहायला मिळाला. याचा अर्थ असा आहे की, या देशातला सामान्य माणूस लोकशाहीच्या अधिकाऱ्याच्या संदर्भात आम्हा राजकारणातल्या लोकांपेक्षा अधिक शहाणा आहे आणि आमचं पाऊल चाकोरीच्या बाहेर टाकतोय असं दिसलं की तो आम्हालाही धडा शिकवतो. त्यामुळे कोणतीही भूमिका घेऊन बसलो की आम्हीच आम्हीच येणारच तर लोकांना ते आवडत नाही”, असंही शरद पवार म्हणाले.
संबंधित बातम्या :
गौप्यस्फोटाला उत्तर गौप्यस्फोटाने, फडणवीसांच्या मुलाखतीला उत्तर पवारांच्या मुलाखतीने!