पंढरपूर : धनगर आरक्षण हा प्रमुख राजकीय पक्षासाठी निवडणुकीत मुद्दा ठरला आहे. धनगर आरक्षण प्रश्न सोडवण्याची मागणी आम्हाला करता आणि मतं दुसऱ्यांना देता, हे बरं नव्हं, अस वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं. करमाळ्यात आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या रश्मी बागल यांनी आयोजित केला होता. या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते.
यावेळी धनगर समाजाच्या नेत्यांनी भाषणात शरद पवारच धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवू शकतात ही आशा व्यक्त केली. यानंतर भाषणात शरद पवार म्हणाले, धनगर समाज मतं दुसऱ्याला देतो आणि आरक्षणाचा प्रश्न मात्र मी सोडवायचा, हे वागणं बरं नव्हं, असं बोलत 2014 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत धनगर समाजाने साथ सोडल्याची खंत व्यक्त केली.
शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोले लगावले. मुख्यमंत्री होण्याआधी फडणवीस यांचं नाव कुणाला तरी माहिती होत का? असा प्रश्न लोकाना विचारला. मुख्यमंत्री शेतात गेल्यानंतर भुईमुगाचा वेल बघून याला शेंगा का आल्या नाहीत असं विचारतात. शेंगा जमिनीखाली असतात एवढही यांना माहिती नाही, असं सांगत मुख्यमंत्र्यांचे शेती प्रश्नाचे अज्ञान सांगितले.
VIDEO : "मतं तिकडं देता आणि धनगर आरक्षणाचा प्रश्न आम्हाला सोडवायला सांगता, हे वागणं बरं आहे का?" : शरद पवार pic.twitter.com/XyY5qGBsBf
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 1, 2019
नगरची जागा काँग्रेसला सोडणार, पवारांची घोषणा
काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातला सर्वात मोठा तिढा जवळपास मिटलाय. कारण, ज्या अहमदनगरच्या जागेसाठी आतापर्यंत चर्चा सुरु होती, ती जागा काँग्रेसला सोडण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अकलूजमध्ये बोलताना याबाबत घोषणा केली. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे या जागेसाठी उत्सुक आहेत. ही जागा आमच्यासाठी सोडावी, अशी मागणी काँग्रेसकडून केली जात होती. कारण, आघाडीत ही जागा राष्ट्रवादीची आहे.
व्हिडीओ पाहा : शरद पवारांनी हात पकडला, तरीही शेखर गोरे ऐकेनात, राष्ट्रवादीच्या बैठकीत गोंधळ