परभणी : राष्ट्रवादीच्या राज्यसभा खासदार फौजिया खान यांना कोरोनाची लागण झाली आहे. राष्ट्रवादीचे परभणी जिल्ह्याध्यक्ष आणि आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्यापाठोपाठ आणखी एका लोकप्रतिनिधीला कोरोनाचा संसर्ग झाल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे. (NCP Rajyasabha MP Fouzia Khan tested Corona Positive)
फौजिया खान यांच्या अँटीजन टेस्टमध्ये कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुंगळीकर यांनी दिली. यापूर्वी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार बाबाजानी दुर्रानी यांचा स्वॅब पॉझिटिव्ह आला होता.
कोण आहेत फौजिया खान?
63 वर्षीय फौजिया खान या राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत. मार्च महिन्यातच त्यांची राज्यसभेवर खासदारपदी निवड झाली आहे.
महाराष्ट्रात आघाडी सरकारच्या काळात त्यांनी शालेय शिक्षण, महिला आणि बाल कल्याण, राज्यमंत्रीपद भूषवले आहे. फौजिया खान याआधी दोन वेळा महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सदस्य राहिल्या आहेत.
Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर
महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्रीपद सांभाळणाऱ्या त्या राज्यातील पहिल्या मुस्लिम महिला आहेत. फौजिया खान अखिल महाराष्ट्र अल्पसंख्याक शिक्षण संघटनेच्या (फेम) प्रमुख असून परभणीमध्ये अनेक शैक्षणिक संस्था चालवतात. (NCP Rajyasabha MP Fouzia Khan tested Corona Positive)
याआधी महाराष्ट्र सरकारमधील राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड आणि धनंजय मुंडे यांनाही कोरोनाची लागण झाली होती. सुदैवाने दोघेही कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरी परतले आहेत.
प्रिया बेर्डेंपाठोपाठ आणखी एक प्रसिद्ध अभिनेत्री राष्ट्रवादीत https://t.co/mPYf83OKWP @NCPspeaks @Jayant_R_Patil #SavitaMalpekar #PriyaBerde
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 21, 2020
संबंधित बातम्या :
जुन्नरमधील राष्ट्रवादीचे नगरसेवक दिनेश दुबे यांचे कोरोनाने निधन
पिंपरी चिंचवडचे राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांचं कोरोनामुळे निधन
(NCP Rajyasabha MP Fouzia Khan tested Corona Positive)