मुंबई : राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्यावर टीका केली आहे. तसंच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही खोचक टोला लगावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठे नेते आहेत. त्यांचा देशाच्या प्रगतीतही मोठी वाटा आहे. पण याचा अर्थ आधीच्या पंतप्रधानांनी काही कामच केलं नाही, असा त्याचा अर्थ होत नाही, असं रोहित पवार म्हणालेत. “राज्यपाल महोदयांचा केवळ250-350 वर्षापूर्वीचा इतिहास कच्चा असल्याचं वाटायचं पण त्यांचं कालचं वक्तव्य बघता मागील 70 वर्षातील इतिहासही कच्चा दिसतो. मोदीसाहेब (PM Narendra Modi) हे मोठे नेते असून देशाच्या प्रगतीत त्यांचा नक्कीच वाटा आहे. पण याचा अर्थ आधीच्या पंतप्रधानांनी काही केलं नाही, असं नाही”, असं रोहित पवार म्हणाले आहेत.
राज्यपाल महोदयांचा केवळ २५०-३५० वर्षापूर्वीचा इतिहास कच्चा असल्याचं वाटायचं पण त्यांचं कालचं वक्तव्य बघता मागील ७० वर्षातील इतिहासही कच्चा दिसतो. मोदी साहेब हे मोठे नेते असून देशाच्या प्रगतीत त्यांचा नक्कीच वाटा आहे. पण याचा अर्थ आधीच्या पंतप्रधानांनी काही केलं नाही, असं नाही.
हे सुद्धा वाचा— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 5, 2022
“आज कळस दिसत असेल तर त्याचा भक्कम पाया हा आधीच घातला गेलेला आहे आणि त्यात आजपर्यंतच्या सर्वच पंतप्रधानांचा वाटा आहे, हे कुणालाही नाकारता येणार नाही. तसंच देश उभारणीत केवळ विशिष्ट नेत्याचंच योगदान असतं असं नाही तर आपली संस्कृती आणि सर्वच भारतीय नागरीकांचे योगदान तेवढंच महत्त्वाचं असतं. म्हणून ‘आधी भारतीयांना किंमत नव्हती’ असं वक्तव्य घटनात्मक पदावरील व्यक्तीने करणं ही अत्यंत निंदनीय बाब आहे”, असंही रोहित पवार म्हणालेत.
तसंच देश उभारणीत केवळ विशिष्ट नेत्याचंच योगदान असतं असं नाही तर आपली संस्कृती आणि सर्वच भारतीय नागरीकांचे योगदान तेवढंच महत्त्वाचं असतं. म्हणून ‘आधी भारतीयांना किंमत नव्हती’ असं वक्तव्य घटनात्मक पदावरील व्यक्तीने करणं ही अत्यंत निंदनीय बाब आहे.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 5, 2022