मुंबई: विधानसभा निवडणुकांचे (seat wise election result 2019) निकाल जाहीर झाले आहेत. विधानसभा निकालात (seat wise election result 2019) 105 जागा मिळवत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. त्यानंतर शिवसेना 56, राष्ट्रवादी 54 (NCP seats increase) आणि काँग्रेसला 44 जागा मिळाल्या. महायुती विरुद्ध महाआघाडी (NCP seats increase) असं चित्र या निवडणुकीत असल्याने अनेक मतदारसंघात दुरंगी तर काही ठिकाणी तिरंगी लढती झाल्या.
अब की बार 220 पारचा नारा देणाऱ्या भाजपला शंभरी गाठताना नाकी नऊ आल्याचं पाहायला मिळालं. भाजप-शिवसेना युतीला यंदा मोठा फटका बसला. दोन्ही पक्षांनी यंदा युती करुनही दोन्ही पक्षाच्या जागा (BJP Seats in Vidhasabha 2019) घटल्या. भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी, सर्वाधिक जागाही भाजपच्याच घटल्या.
वाचा : शरद पवारांची साथ सोडलेल्या आमदारांचं काय झालं?
भाजपला 2014 मध्ये 122 जागा मिळाल्या होत्या, यंदा भाजपची गाडी 105 जागांवर घसरली. म्हणजेच भाजपला 17 जागांवर फटका बसला.
शिवसेनेचे 63 आमदार होते, यंदा त्यांचे 56 आमदार निवडून आले. म्हणजे सेनेला 7 जागा गमवाव्या लागल्या.
दुसरीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने या निवडणुकीत मोठी झेप घेतली. 2014 मध्ये राष्ट्रवादीचे 41 आमदार होते. यंदा त्यामध्ये 13 जागांची वाढ होऊन, 54 आमदार निवडून आले. काँग्रेसलाही यंदा काहीही न करता दोन जागांचा फायदा झाला. काँग्रेसचं संख्याबळ 42 वरुन 44 वर पोहोचले.
राष्ट्रवादीच्या जागा वाढल्या
यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस सर्वाधिक चर्चेत होतं. शरद पवारांना सोडून अनेक आमदारांनी सत्ताधारी शिवसेना-भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र तरीही पवारांनी राज्यभर सभा घेऊन 41 वरुन आमदारांची संख्या 54 वर नेली.
पक्ष – (वाढ/घट) <2014 मधील जागा>
2019 विधीमंडळात कोणत्या पक्षाचे किती आमदार धडकणार? पक्षनिहाय निकाल
(Maharashtra Vidhansabha Election Partywise Result)
संबंधित बातम्या