मुंबई : एप्रिल महिन्यात होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकासआघाडीत चुरस पाहायला मिळत (NCP nomination for Rajyasabha election) आहे. येत्या मार्च महिन्यात राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि माजी मंत्री फौजिया खान यांना राज्यसभेसाठी उमेदवारी दिली जाणार आहे.
महाराष्ट्राच्या कोट्यातील राज्यसभेच्या 7 जागा 2 एप्रिलला रिक्त होणार आहेत. यात महाविकासआघाडीला 4 जागा मिळणार आहे. तर राष्ट्रवादीच्या वाटेला 2 जागा मिळणार आहे. या दोन्ही जागांपैकी एका जागेवर राष्ट्रवादीकडून शरद पवार यांचे नाव निश्चित करण्यात आले होते. त्यानंतर आता फौजिया खान यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
राज्यात महाविकास आघाडी तयार झाल्यानंतर स्थानिक पातळीपासून राज्य पातळीवर राजकारण बदललं आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत आल्याने महाविकासआघाडीची ताकद वाढली आहे. त्यामुळे पवार आणि खान यांचा राज्यसभा निवडणुकीतील विजय सोपा मानला जात आहे.
महाराष्ट्राच्या कोट्यातून राज्यसभेवर निवडून गेलेल्या 7 खासदारांचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात संपत आहे. या 7 जागांसाठी येत्या 26 मार्चला निवडणूक होणार आहे. फौजिया खान या माजी मंत्री आहेत. त्यामुळे त्यांना उमेदवारी देऊन त्यांचं राजकीय पुनर्वसन करण्यात येणार (NCP nomination for Rajyasabha election) आहे.
राज्यसभा नियुक्तीसाठी निकष काय?
राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी उमेदवाराला पहिल्या पसंतीची 37 मतं आवश्यक आहेत. त्यामुळे आघाडीचे (राष्ट्रवादी-शिवसेना 2-2) चार तर भाजपचे दोन उमेदवार सहज निवडून येतील. शिल्लक राहिलेल्या मतांमधून आणखी एक उमेदवार निवडून आणण्याचा आघाडीचा आणि भाजपचा प्रयत्न राहणार आहे.
राज्यसभेच्या सात जागांबाबत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे नेते एकत्रित बसून निर्णय घेणार आहेत. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीत सातव्या जागेसाठी भाजपने उमेदवार दिल्यास चुरस पाहायला मिळेल. पण छोटे आणि अपक्ष सत्ताधारी पक्षाच्या बाजूने राहिल्याचं दिसून येतं. त्यामुळे भाजपला एका जागेचा फटका बसू शकतो.
उदयनराजेंना केंद्रात मंत्रिपद?
मार्च महिन्यात राज्यसभेच्या सात जागांची मुदत संपणार आहे. यावेळी होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपकडून उदयनराजेंना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. उदयनराजेंची राज्यसभेवर नियुक्ती झाल्यास केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यताही नाकारता येत (NCP nomination for Rajyasabha election) नाही.