दिल्लीतील काँग्रेस नेत्यांची मुंबईत पवारांसोबतची बैठक रद्द

| Updated on: Nov 12, 2019 | 9:42 AM

काँग्रेसच्या दिल्लीत नेत्यांची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांसोबत होणारी बैठक रद्द करण्यात आल्याची माहिती काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी (NCP -Congress Meeting Cancelled)  दिली.

दिल्लीतील काँग्रेस नेत्यांची मुंबईत पवारांसोबतची बैठक रद्द
Follow us on

नागपूर : विधानसभा निवडणुकांचा निकाल लागून 20 वा दिवस उलटला तरी सत्तासंघर्षाचा पेच अद्याप कायम (NCP -Congress Meeting Cancelled) आहे. या सत्तासंघर्षात काल (11 नोव्हेंबर) 19 व्या दिवशी नाट्यमय घडामोडी झाल्याचे पाहायला मिळालं. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सहाय्याने शिवसेना महासेनाआघाडी सरकार स्थापन करणार असं वाटत असतानाच शिवसेनेचा भ्रमनिराश (NCP -Congress Meeting Cancelled)  झाला. शिवसेनेनं सत्ता स्थापनेचा दावा केला खरा, पण दोन्ही काँग्रेसचं पाठींब्याचं पत्रच न मिळाल्यानं शिवसेनेची दोन्ही काँग्रेसनं गोची केल्याचं पाहायला मिळालं. यानंतर आता काँग्रेसच्या दिल्लीत नेत्यांची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांसोबत होणारी बैठक रद्द करण्यात आल्याची माहिती काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी (NCP -Congress Meeting Cancelled)  दिली.

“सत्तास्थापनेसंदर्भात राष्ट्रवादीसोबत चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे दिग्गज नेते दिल्लीतून आज मुंबईत येणार होते. मात्र मुंबईत होणारी ही बैठक रद्द करण्यात आली आहे. येत्या एक किंवा दोन दिवसात ही चर्चा होणार आहे,” अशी माहिती माणिकराव ठाकरे यांनी दिली आहे.

“काँग्रेसची काल ज्या काही बैठका झाल्या. त्यात राज्यात सत्तास्थापनेसंदर्भात काय करावे याचा निर्णय झालेला नाही. याबाबत काँग्रेसचे काही नेते राष्ट्रवादीच्या प्रमुखांना भेटणार होते. त्यानंतर ते शिवसेनेसोबत चर्चा करणार होते. मात्र अचानक शरद पवारांनी ही बैठक रद्द केली आहे. त्यामुळे काँग्रेस नेते वेणुगोपाल, अहमद पटेल, मल्लिकार्जुन खर्गे यांची शरद पवारांशी होणारी महत्त्वपूर्ण बैठक रद्द करण्यात आली आहे,” असेही ते म्हणाले.

दरम्यान आज संध्याकाळी 4 च्या दरम्यान राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीत कोणता निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

“राज्यपालांनी राष्ट्रवादीला सत्तास्थापनेसाठी आमंत्रण दिलं आहे. त्यांनी बहुमत सिद्ध केलं नाही. तर त्यानंतर काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिलं जाईल. मात्र काँग्रेसनेही बहुमत सिद्ध न केल्यास राष्ट्रपती राजवट लागू होईल. जरी राष्ट्रपती राजवट लागली, तरीही आम्ही एकत्र येऊन बहुमत सिद्ध करु शकतो,” असेही माणिकराव ठाकरे (NCP -Congress Meeting Cancelled)  म्हणाले.

दरम्यान काँग्रेस हायकमांड सोनिया गांधी यांचं मन वळवण्यात पक्षाच्या महाराष्ट्रातील नेत्यांना यश आल्याची चर्चा काल होती. मात्र अजून त्याबाबत स्पष्टता आलेली नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीचं पाठिंब्याचं पत्र न मिळाल्यामुळे शिवसेनेची अडचण झाली. शिवसेना नेत्यांनी राजभवनावर जाऊन राज्यपालांकडे मुदतवाढ मागितली, पण राज्यपालांनी नकार दिला.

काँग्रेस शिवसेनेला बाहेरुन पाठिंबा देण्यास राजी झाल्याचं सांगण्यात आलं. काँग्रेस-राष्ट्रवादीकडून शिवसेनेला पाठिंब्याची पत्रं देण्यात आल्याचीही माहिती पुढे आली. त्यामुळे महाराष्ट्रात आता महासेनाआघाडीचं सरकार येणं जवळपास निश्चित मानलं जात होतं. इतकंच काय, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होतील, आणि अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपद मिळेल, अशी अटकळ बांधली गेली. परंतु काँग्रेसच्या पाठिंब्याचं पत्र न मिळाल्यामुळे या चर्चेतील हवा निघाली.

शिवसेनेने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला. मात्र राज्यपालांनी मुदतवाढ दिलेली नाही.