उत्तमराव जानकरांची राष्ट्रवादीकडे तक्रार, माळशिरस तालुक्याची कार्यकारिणी बरखास्त

| Updated on: Jul 10, 2021 | 9:40 AM

राष्ट्रवादी काँग्रेसकडून माळशिरस विधानसभा निवडणूक उत्तम जानकर यांनी लढवली होती. मात्र उत्तम जानकरांचा कमी मताने पराभव झाला होता.

उत्तमराव जानकरांची राष्ट्रवादीकडे तक्रार, माळशिरस तालुक्याची कार्यकारिणी बरखास्त
Uttamrao Jankar
Follow us on

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसची माळशिरस तालुका कार्यकारिणी बरखास्त करण्यात आळी आहे. विधानसभेचे पराभूत उमेदवार उत्तमराव जानकर (Uttamrao Jankar) यांनी पक्षाकडे यासंदर्भात तक्रार केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी माळशिरस तालुक्याची कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. (NCP Solapur Malshiras executive committee supsended after Uttamrao Jankar complaints)

विधानसभा निवडणुकांपूर्वी कार्यकारिणी नियुक्त 

विधानसभा निवडणुकीपूर्वी माणिक वाघमोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी वर्णी लागली होती. याशिवाय तालुक्याची कार्यकारिणी नियुक्त झाली होती. यावेळी विधानसभेचे पराभूत उमेदवार उत्तम जानकर यांनी माणिक वाघमोडे यांच्या निवडीबाबत पक्षाकडे तक्रार केली होती. उत्तम जानकर हे धनगर समाजाचे नेते आहेत.

विधानसभेला उत्तम जानकरांचा पराभव

2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी जिल्ह्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या होत्या. जिल्ह्याचे प्रमुख नेते विजयसिंह मोहिते यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून माळशिरस विधानसभा निवडणूक उत्तम जानकर यांनी लढवली होती. मात्र उत्तम जानकरांचा कमी मताने पराभव झाला होता.

देशमुख आणि जानकर असे दोन गट

उत्तम जानकर यांनी तालुक्याची राष्ट्रवादी कॉंग्रेस आपल्या नियंत्रणाखाली असावी, अशी अपेक्षा पक्षश्रेष्ठींसमोर व्यक्त केली होती. शिवाय माळशिरस तालुक्यात शंकरराव देशमुख आणि उत्तम जानकर असे दोन गट तयार झाले होते. प्रदेशवर असणारे शंकरराव देशमुख यांनी तालुक्याची कार्यकारिणी परस्पर जाहीर केली होती. आता उत्तम जानकर यांच्या तक्रारीवरून माळशिरस राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

‘धुमस’ सिनेमात एकत्र काम, धनगर आरक्षणाचा एकत्र लढा, पडळकरांचे मित्र उत्तमराव जानकर म्हणतात…