शिवसेनेचा जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादीचा उमेदवार, चंद्रकांत पाटलांमुळे खडसेंची डोकेदुखी

| Updated on: Oct 07, 2019 | 5:32 PM

एकनाथ खडसेंचे कट्टर विरोधक असलेल्या चंद्रकांत पाटलांनी (Chandrakant Patil vs Rohini Khadse)  आता राष्ट्रवादीच्या जोरावर रोहिणी खडसेंविरोधात दंड थोपटल्याचं चित्र आहे.

शिवसेनेचा जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादीचा उमेदवार, चंद्रकांत पाटलांमुळे खडसेंची डोकेदुखी
Follow us on

जळगाव : उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. शिवसेनेचा जिल्हाप्रमुख राष्ट्रवादीचा उमेदवार ठरल्याचं चित्र जळगावात आहे. राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने, राष्ट्रवादीने अपक्ष अर्ज भरलेल्या शिवसेनेच्या जळगाव जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना (Chandrakant Patil vs Rohini Khadse) आपला पुरस्कृत उमेदवार म्हणून पाठिंबा दिला. त्यामुळे एकनाथ खडसेंचे कट्टर विरोधक असलेल्या चंद्रकांत पाटलांनी (Chandrakant Patil vs Rohini Khadse)  आता राष्ट्रवादीच्या जोरावर रोहिणी खडसेंविरोधात दंड थोपटल्याचं चित्र आहे.

मुक्ताईनगर येथील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी पदाचा राजीनामा दिला.  राष्ट्रवादीचे  उमेदवार रवींद्र भैय्या पाटील यांनी आज आपल्या उमेदवारीचा अर्ज मागे घेऊन राष्ट्रवादीचे पुरस्कृत उमेदवार म्हणून चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा दिला आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांनी मला राष्ट्रवादीचे पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर केले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, असे चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

चंद्रकांत पाटील यांना राष्ट्रवादीने पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर केल्याने आता खरी रंगत भाजपच्या उमेदवार रोहिणी खडसे खेवलकर आणि राष्ट्रवादीचे पुरस्कृत उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये रंगणार असल्याने सर्वांचे या लढतीकडे लक्ष लागले आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची लढत आहे.