मुंबई – सध्या महाराष्ट्रातील महाविकास आघाडी (MVA) अस्थिर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. शिवसेनेच्या (Shivsena) आमदारांनी बंड केल्यापासून दोन गटात आरोप-प्रत्योरोप सुरू आहेत. त्यामुळे राज्यात कधीही नवीन सरकार येईल अशी स्थिती आहे. पण महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी आपल्या कामाचा धडाका कायम ठेवला असून चांगले निर्णय घेतले जात आहेत. आदित्य ठाकरे (Aditya thackeray) यांनी वरळीतील बीडीडी चाळीतील पोलिस वसाहतीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी 25 लाखांत घर देणार असल्याचे महाविकास आघाडीकडून जाहीर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे पुनर्विकास प्रकल्पात बांधकाम खर्चात पोलिस कर्मचाऱ्यांना घर देण्याचा निर्णय देण्यात आला आहे. पूर्वी त्या घरांच्या किंमत 50 लाख ठरविण्यात आली होती. पण पोलिस बांधवांनी विनंती केल्यानंतर त्यांना सरकारकडून दिलासा देण्यात आला आहे. 25 लाखांत घर देणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी जाहीर केले आहे.
माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी आणि माझे नेते शरद पवारसाहेब ह्यांच्या सल्ल्या नुसार #BDD चाळी तील निवृत्त पोलिस कर्मचाऱ्यांना कायम स्वरूपी घर नावावर करून देण्यात आले
आता ती घर 50 लाख ऐवजी 25 लाख रुपयात देण्यात येतील
आता घर रिकामी करा आणि प्रकल्प पुढे जाऊद्यात #24तास_जनतेसाठी हे सुद्धा वाचा— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 27, 2022
बीडीडी चाळींमधील 2,250 पोलीस कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी जाहीर केले की, पुनर्विकासानंतर घरांची किंमत 50 लाखांवरून 25 लाख रुपये करण्यात आली आहे. आदित्य ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड यांनी बातमी त्यांनी चाळीत जाऊन सांगितली. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर वेगळेचं हास्य उमटले.
माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माझे नेते शरद पवार यांच्या सूचनेनुसार बीडीडी चाळींमधील सदनिका कायमस्वरूपी त्यांच्या नावावर करण्यात आल्या आहेत. आता 50 लाखांऐवजी 25 लाखांना घरे दिली जाणार आहेत. आता घर रिकामे करा आणि प्रकल्पाला पुढे जाऊ द्या,’ असे आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.