नीलम गोऱ्हे आणि एकनाथ शिंदे यांची हॉटेल ट्रायडेंटमध्ये भेट, केंद्रातील भाजपचा बडा नेताही सोबतीला, काय चर्चा?

| Updated on: Nov 19, 2022 | 10:48 AM

नीलम गोर्‍हे आणि एकनाथ शिंदे यांच्यात भेट झाली आहे. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.

नीलम गोऱ्हे आणि एकनाथ शिंदे यांची हॉटेल ट्रायडेंटमध्ये भेट, केंद्रातील भाजपचा बडा नेताही सोबतीला, काय चर्चा?
Follow us on

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या डॉ. नीलम गोर्‍हे (Neelam Gorhe) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात भेट झाली आहे. हॉटेल ट्रायडेंटमध्ये ही भेट झाली. या भेटीनंतर चर्चांना उधाण आलं आहे. नीलम गोऱ्हे मागच्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा होती. त्यानंतर त्यांची मुख्यमंत्री शिंदेंसोबत (Eknath Shinde) झालेली ही भेट महत्वाची आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.

भाजप नेताही सोबतीला

मुख्यमंत्री शिंदे आणि नीलम गोऱ्हे यांची भेट झाली तेव्हा भाजप नेते आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लाही तिथे उपस्थित होते. ओम बिर्ला मुंबई आहेत.या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री शिंदे आणि नीलम गोऱ्हे यांनी त्यांची भेट घेतली. या भेटीवेळी शिंदे-गोऱ्हे एकत्र दिसल्याने एकच चर्चा रंगली आहे.

यावेळी खासदार गजानन कीर्तिकर, खासदार राहुल शेवाळेही तिथे उपस्थित होते.

ओम बिर्ला मुंबई दौऱ्यावर आहेत. अशावेळी त्यांच्याशी काही बाबींवर चर्चा करायची होती. त्यासाठी मी तिथे गेले होते. तेव्हा मुख्यमंत्रीही तिथे होते. हा निव्वळ योगायोग होता. ही केवळ सदिच्छा भेट होती. यात कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही, असं नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केलं.

नीलम गोऱ्हे नाराज?

नीलम गोऱ्हे या मागच्या काही दिवसापासून शिवसेनेच्या ठाकरे गटात नाराज असल्याचं बोललं जातंय. त्या ठाकरे गटाला रामराम करण्याच्या तयारीत असल्याचीही चर्चा आहे. नीलम गोऱ्हे यांच्या निकटवर्तीय शर्मिला येवले आपल्या समर्थकांसह युवतीसेनेला रामराम करण्याच्या तयारी आहेत. अशात नीलम गोऱ्हे यांची मुख्यमंत्र्यांसोबतची भेट महत्वपूर्ण आहे.