Neelam Gorhe : विधान परिषदेत भरलेल्या जागांपेक्षा पंकजांचं काम चांगलं, पंकजा मुंडेंचं निलम गोऱ्हेंकडून तोंडभरुन कौतुक

| Updated on: Jun 05, 2022 | 2:54 PM

शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी यावेळी वेगवेगळ्या मुद्दयांवर भाष्य केलंय.

Neelam Gorhe : विधान परिषदेत भरलेल्या जागांपेक्षा पंकजांचं काम चांगलं, पंकजा मुंडेंचं निलम गोऱ्हेंकडून तोंडभरुन कौतुक
निलम गोऱ्हे, उपसभापती, विधानपरिषद
Image Credit source: social
Follow us on

औरंगाबाद : भाजप (BJP) आणि शिवसेना (Shivsena) या दोन्ही पक्षातील नेत्यांमधलं द्वंद महाराष्ट्रासह अवघ्या देशाला माहिती आहे. या न त्या कारणावरुन दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर वार-पटलवार करत असतात. यात शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी आज थेट भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचं कौतुक केलंय. आता शिवसेनेच्या नेत्यांनी भाजपच्या नेत्यांचं कौतुक करणं अभावानंच दिसून येतं. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं देखील अनेकदा स्वत: शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केलंय. शिवसेवा नेते संजय राऊत देखील त्यांच्या कामाचं कौतुक करताना दिसून येतात. पण, गडकरी हे राष्ट्रीय नेते आहे. अगदी सर्वच पक्षांच्या नेते त्यांच्याविषयी बोलताना दिसून येतात.  मात्र, आता शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचं कौतुक केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. निलम गोऱ्हे नेमकं काय म्हणाल्या याबाबतही उत्सुका लागून आहे. हेच आम्ही तुम्हाला संगणार आहोत.


औरंगाबादेत ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवर बैठक झाली. यावेळी पोलीस आयुक्तांन समवेत निलम गोऱ्हे यांनी बैठक घेतली. 8 जूनला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा आहे. मराठवाड्याचं आणि शिवसेनेचे नात खूप वेगळे आहे, असंही सांगायला निलम गोऱ्हे विसरल्या नाही. उद्धव ठाकरे यांचं या शहराकडे विशेष लक्ष असतं.  संकुचित बुद्धीने मला मुख्यमंत्री व्हायचं, असं कुणी म्हणत असेल त्याचं एन्काऊंटर करायचं काम भाजप करतंय, अशी टीकाही निलम गोऱ्हेंनी यावेळी केली.  तर आमची लोक आनंदाने येतायेत. मुख्यमंत्री काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष, असंही त्या म्हणाल्या.

हे सुद्धा वाचा

पंकजा मुंडेंचं तोंडभरून कौतुक

यावेळी बोलताना निलम गोऱ्हे म्हणाल्या की, ‘आम्हाला सर्व निवडणुकीत यश मिळेल. विधान परिषदेत ज्या जागा भरल्या त्यापेक्षा पंकजा मुंडे यांचं काम चांगलं आहे. त्यांना संधी मिळाली पाहिजे. असंही त्या यावेली म्हणाल्या. दरम्यान, यावेळी त्यांनी वेगवेगळ्या मुद्दयांवर भाष्य केलंय. राजकीय भ्रष्टाचाराची वाळवी महापालिकेला लागलीये. काश्मीर पंडितांच्या मागे अहोत, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. मी एकदा तिकडे गेले होते तेव्हा तिकडचे लोक मला पहिल्यानंतर जय महाराष्ट्र म्हटले होते, अशी आठवणही त्यांनी यावेळी सांगितली. दरम्यान, तुम्ही अनेक नेत्यांना केंद्राची सुरक्षा पुरवतात मात्र, काश्मीर पंडितांना कधी सुरक्षा पुरवणार, असा टोलाही शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनी भाजपला आणि केंद्र सरकारला लगावलाय.