नवी दिल्ली : शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघात केला. गुलामाला आपल्या मालकांचं कौतुक करावंच लागतं.मांडलिक आपले राजे होते संस्थानिक होते. मात्र ब्रिटिश राजवटीत मुजरे करावे लागायचे, अशा शब्दात संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही संजय राऊतांनी टीका केली आहे.
संजय राऊतांनी मोदी-शाहांवरही टीका केली आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यासाठी गुजरात हाच भारत देश आहे. सगळी गुंतवणूक ही गुजरातला नेली जात आहे, असं संजय राऊत म्हणालेत.
गद्दारांना उत्तेजन देणारे हे लोकं आहेत. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची स्थापना कधी केली? हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली आणि उद्धव ठाकरेंना त्यांनी कार्यकारी अध्यक्ष केलं होतं, असं संजय राऊत म्हणालेत.
19 जूनला वर्धापन दिन साजरा होईल. हिंमत असेल तर मिळालेल्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूका लढवण्याची हिंमत दाखवा. तुमचे नेते नरेंद्र मोदी आहेत. तर तुम्ही मोदींच्या नावावर मतं मागा आणि जिंकून येऊन दाखवा, असं राऊतांनी म्हटलं आहे.
एकनाथ शिंदे लाचारी करतायेत. गेली 30 वर्षे मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकतो आहे. मिंधे गटाच्या एकाही आमदारामध्ये धमक नाही की शिवसेनेचा भगवा फडकेल. मराठी माणसाकडे मुंबई असली तरच मुंबई महाराष्ट्रात राहिलं, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
एकनाथ शिंदे लाचारी करतायेत. गेली 30 वर्षे मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकतो आहे. मिंधे गटाच्या एकाही आमदारामध्ये धमक नाही की शिवसेनेचा भगवा फडकेल. मराठी माणसाकडे मुंबई असली तरच मुंबई महाराष्ट्रात राहिलं, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
शिंदेगटाविषयी लोकांच्या मनात सहानुभूती नाही तर चीड आहे. निवडणुकांना कितीही झाला तरी ही चीड चिरडून टाकेल. लोक त्यांना त्यांची जागा दाखवतील, असं राऊतांनी म्हटलं आहे.
आम्ही संविधान वाचवण्यासाठी एकत्र येत आहोत. आता इथून पुढे हुकूमशाही पद्धतीने देश चालणार आहे. प्रजासत्ताक टिकवण्यासाठी सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधकांचंही असतं, त्याचसाठी आता विरोधी पक्षांनी एकत्र यायचं ठरवलं आहे.
नवीन संसद इमारात उद्घाटनावेळी विरोधी पक्षांना स्थान असायला हवं होतं. 9 वर्षात जी विकासकामे झालीत ती दाखवा. 2019 ला काश्मिरी पंडीतांच्या नावावर भाजप निवडून आली आणि आता त्यावर बोलायला तयार नाहीत, असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र डागलंय.