‘या’ तारखेला ठरणार मराठा आंदोलनाची पुढील रणनीती; मनोज जरांगे पाटील पुन्हा ॲक्शन मोडमध्ये

| Updated on: Dec 14, 2023 | 1:27 PM

मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांना सरकारने दिलेली मुदत येत्या 24 डिसेंबरला संपत आहे. आता ही मुदत संपत आल्याने मनोज जरांगे आता पुन्हा सक्रीय होणार आहेत. त्यांनी पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी नवीन तारीख दिली आहे. या तारखेला समाजातील अभ्यासक, तज्ज्ञांची बैठक घेऊन मराठा आंदोलनाची पुढील रणनीती ठरविली जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

या तारखेला ठरणार मराठा आंदोलनाची पुढील रणनीती; मनोज जरांगे पाटील पुन्हा ॲक्शन मोडमध्ये
Manoj Jarange Patil
Follow us on

दत्ता कानवटे, टीव्ही 9 मराठी, प्रतिनिधी, संभाजीनगर | 14 डिसेंबर 2023 : मी हवेवर स्वार होणारा नाही, हवेचा वापर कोण करतो हे तुमच्याकडून शिकावं, हवेचा रोख कसा असतो आणि त्याचा लाभ कसा घ्यावा हे तुम्हाला माहिती आहे. मी मराठा सेवक आहे असे मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. 24 तारखेला सरकारने आरक्षण दिले नाही तर पुढचं आंदोलन शांततेत असले तरी मोठं आंदोलन उभे करण्यात येईल, यासंदर्भात येत्या 17 तारखेला आंदोलनाची पुढील दिशा ठरविली जाईल असेही जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

आम्ही 24 तारखेनंतर ही बैठक घेणार होतो, मात्र काही घटना सरकारवरचा विश्वास उडाल्या सारख्या झाल्या आहेत. त्यामुळे नाईलाजास्तव 17 तारखेला बैठक घ्यावी लागत आहे. गप्पा मारत नाही, पूर्वीचा मराठा आता राहिला नाही. शांततेत आता आंदोलन करेल, कुठल्याही नेत्याला न जुमानता रस्त्यावर उतरून आंदोलन करू असेही जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. अजून आंदोलन कसे असावे हे ठरलेले नाही, सोशल मिडीयावर जे व्हायरल होत आहे ती समाजाची भावना असू शकते. 17 तारखेच्या बैठकीत आंदोलनाचा अंतिम निर्णय ठरेल, दोन दिवस उशिरा मात्र थेट निर्णय घेऊ असेही जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. सकाळी 9 ते 12 पर्यंत परिचय बैठक होणार आहे, त्यानंतर प्रमुख बैठक होईल आणि राज्यभरातील अभ्यासक वकील, इतिहास तज्ञ, साहित्यिक आणि प्रमुख आंदोलक उपस्थित राहतील असेही त्यांनी सांगितले.

भुजबळांना हवी तेवढी सुरक्षा द्या

अन्यायाविरोधात आवाज उठविला त्याला झुंडशाही म्हणत असाल तर त्याचे विचार किती प्रगल्भ आहे हे कळते. गावागावात आंदोलन उभे करायचे, कोयत्याची भाषा करायची आणि कोण तुला कोण गोळी मरणार? कोण तो पोलीस गोळी मारणार म्हणून सांगणारा, येडपट सारखं म्हणतो काहीपण, दौऱ्यामध्ये काही संशय आला, आता मात्र ते काही सांगत नाही. आमच्या दौऱ्याला पोलीस संरक्षण मिळत नव्हते, 30-30 किलोमीटर पोलीस नसायचे. आमच्या जीवाला धोका असा रिपोर्ट पोलिसांनी का दिला नाही असा सवाल जरांगे पाटील यांनी केला आहे. आम्हाला सुरक्षा देऊ पण भुजबळाला हवी तेवढी सुरक्षा द्या असेही त्यांनी यावेळी सांगितले.

फडणवीसांनी डाव ओळखावा

देवेंद्र फडणवीस यांनी याचा डाव समजला पाहिजे, हा विश्वास घातकी माणूस आहे, सरकार विरोधात सामान्य माणसाचा रोष वाढायला लागला आहे. त्याला गर्दी वाढवून स्वतः वरच्या केसस मागे घ्यायच्या आहेत असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. केवळ क्लिप व्हायरल केली म्हणून मराठा तरुण अनेक महिन्यांपासून आतमध्ये आहेत. एवढं काय केलं त्यांनी. त्याचं ऐकूण तुम्ही मराठ्यांवर अन्याय करू लागला हे समाजमाध्यमांतून घराघरात दिसून येत आहे, सरकारने मराठ्यांवर अन्याय होऊ देऊ नये अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे.

त्याच्या गळ्यात हात टाकून फिरावं लागेल

सामान्य धनगर बांधवांना माझी विनंती आहे. हा द्वेष पसरवत आहे. सुड भावनेने मराठ्यांशी वागू नये, होत असलेली गर्दी ही वेदनेची आहे. धनगर आणि वंजारी समाजाला धक्का लागत नाही हे समाज बांधवांनी समजून घ्यावे, चंद्रकांत दादा पाटील यांना विनंत्ती ews, सह इतर विद्यार्थांना नियुक्ती द्या. तो बोलला की आमच्या लोकांना लगेच अटक होत आहे, phd चे विद्यार्थी, mpsc विद्यार्थी आहेत, महाराष्ट्रातील सर्व केसेस मागे घ्या, फडणवीस साहेब त्याचे ऐकून जर मराठ्यांवर अन्याय केला तर त्याच्याच गळ्यात हात टाकून फिरावं लागेल. आम्ही आंदोलनाचा फायदा समाजासाठी करीत आहे, 39 लाख मराठ्यांना कुणबीचे प्रमाणपत्र मिळाले हा आंदोलनाचा फायदा असल्याचे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. कुणबी प्रमाणपत्र सरसकट मराठ्यांना द्यावं या भूमिकेवर आम्ही ठाम, ज्याला घ्यायचे त्यांनी घ्यावे ,ज्याला घ्यायचे नाही त्यांनी घेऊ नये असेही जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.