सिंधुदुर्ग : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बारामती दौऱ्यावर असताना भाजपवर जोरदार हल्ला चढवला. ‘राजकारणातही एक इन्क्युबेशन सेंटर आवश्यक असतं. आम्हीही उघडलं होतं 25-30 वर्षे. इन्क्युबेशनला मराठीत उबवणी केंद्र म्हणतात. आम्हीही नको ती अंडी उबवली. त्याचं पुढे काय झालं ते तुम्ही बघत आहात’, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपला नाव न घेता टोला लगावला. माजी खासदार आणि भाजपचे नेते निलेश राणे यांनी आता उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. (Nilesh Rane criticizes CM Uddhav Thackeray, Vinayak Raut and Nawab Malik)
मुख्यमंत्री काय बोलतात हे कळत नाही. त्यांचे बोलणे समजण्यासाठी ट्रान्सलेटर लागतो. 25 वर्षे स्वर्गीय बाळासाहेबांनी सेना-भाजप युती जपली, उद्धव ठाकरे यांनी नाही. सेनेचे भाजपवर आणि भाजपचे सेनेवर प्रेम होते. यात उद्धव ठाकरे कुठेच नव्हते. त्यामुळे त्यांना युतीवर भाष्य करण्याचा अधिकार काय? असा सवाल निलेश राणेंनी केलाय. 1995 पर्यंत उद्धव ठाकरे यांच्या हातात कॅमेराच होता, ते जंगलात फिरत होते. भाजपशी उद्धव ठाकरे यांचा काय संबंध. तुटलं काय किंवा जुळलं काय. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसारखं बोललं पाहिजे. तुम्ही यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ट्रेनिंग घ्या. कारण तुम्ही नारायण राणेंकडून ट्रेनिंग घेणार नाहीत. त्यानंतर बोलायला शिका आणि मग कुणी 25 वर्षे अंडी उबवली त्यावर भाष्य करा. 2024 मध्ये महाराष्ट्रातील जनतेनं तुम्हाला अंडी उबवण्यासाठी ठेवलंय हे कळेल, असा जोरदार टोला निलेश राणेंनी लगावलाय.
नबाव मलिक यांच्यावरही निलेश राणेंनी हल्ला चढवलाय. नवाब मलिकांची अवस्था पिसाळल्यासारखी आहे. ते काय बोलतात त्याला अर्थ नसतो. त्यांची वक्तव्य महाराष्ट्राच्या हिताची नाहीत. जावयाला वाचवण्यासाठी, त्याच्या प्रेमापोटी त्यांची ही वक्तव्य सुरु आहेत. एका अधिकाऱ्याची तुम्हाला हकालपट्टी करायची आहे. पण ती होत नसल्याचं रोज आरोप सुरु आहेत. जावयाला अटक केली म्हणून अधिकाऱ्यावर वचपा काढायचा आहे. तुमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही का? असा सवाल निलेश राणे यांनी मलिकांना विचारलाय.
विनायक राऊत यांना वैद्यकीय महाविद्यालय म्हणजे काय ते विचारा. त्यांनी ती डिस्पेंसरी वाटते. आमचं मेडिकल कॉलेज अनेकवेळा रिजेक्ट झालंय. आम्ही भाजपमध्ये आल्यानंतरही ते रिजेक्ट झालं होतं. तुमची फॅसिलिटी चांगली असेल तर सर्व काही व्यवस्थित असेल तर का परवानगी मिळणार नाही? तुमची एक वीट बरोबर नाही, फॅकल्टी नाही, ते काय आम्ही थांबवलं का? हे सर्व विषय विनायक राऊत यांचे नाहीत. ते बालवाडीत आहेत. त्यांना अजून काही कळत नाही, असा जोरदार टोला निलेश राणेंनी विनायक राऊतांना लगावलाय.
फॅकल्टी काय? मेडिकल कॉलेज उभारायचं कसं? त्यासाठी विनायक राऊत यांनी निलेश राणेंकडे यावं. मी त्यांना सर्व माहिती समजावून सांगेन. जर त्यांना कळत नसेल तर त्यांनी दुसरा माणूस नियुक्त करावा. मग पहा मेडिकल कॉलेज उभं राहतं की नाही, असंही निलेश राणें म्हणाले.
इतर बातम्या :
Video : कोरोनाची लस घेतलीही नाही आणि घेणारही नाही, इंदोरीकर महाराजांच्या वक्तव्याने नवा वाद
Nilesh Rane criticizes CM Uddhav Thackeray, Vinayak Raut and Nawab Malik