सिंधुदुर्ग : कोरोनाच्या काळात स्वतःच्या मतदारसंघातून गायब झालेले शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर 2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतर सिंधुदुर्गाच्या राजकारणातून कायमचे गायब होतील, असा घणाघात माजी खासदार निलेश राणे यांनी केला. खासदार नारायण राणे यांच्यावर केसरकरांनी केलेल्या टीकेचा निलेश राणे यांनी समाचार घेतला. (Nilesh Rane hits back at Deepak Kesarkar criticism on Narayan Rane)
दीपक केसरकर यांना आता शिवसेनेतही गांभीर्याने घेत नाहीत. त्यांची अवस्था निवडणुकीनंतर शिवसेनेत काय झाली, त्यांची काय किंमत आहे, ते लोकांनी बघितले आहे, अशी टीका निलेश राणेंनी केली.
“सावंतवाडीमध्ये, त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघामधे, कोरोनाला घाबरुन ते उंदरासारखे मुंबईत लपून बसले होते. मतदारांना त्यांनी वाऱ्यावर सोडलं होतं. एक साधा मास्क किंवा सॅनेटायझरची बॉटल त्यांनी स्वतःच्या खर्चाने मतदारांना दिली नाही, असा माणूस दुसऱ्यावर टीका करतो, ते पण नारायण राणेंवर. केसरकरांनी आयुष्यभर राणेंवर टीका केली. नारायण राणे यांचं नाव घेऊन मोठे झाले, मंत्री झाले, नारायण राणेंमुळेच त्यांना महाराष्ट्रात ओळख मिळाली, त्यामुळे अशा माणसाला आम्ही गांभीर्याने घेत नाही” अशा शब्दा निलेश राणेंनी निशाणा साधला
2024 च्या निवडणुकीनंतर जसे कोरोनाच्या काळात केसरकर एक वर्ष गायब होते तसेच सिंधुदुर्गाच्या राजकारणातून कायमचे गायब होतील, याची खात्री मी तुम्हाला देत असल्याचंही निलेश राणे म्हणाले.
केसरकर काय म्हणाले होते?
“सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही नेते जीडीपीबद्दल बोलतात, पण त्यांनी आधी जीडीपीचा फुल फॉर्म सांगावा” असा टोला दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांना नाव न घेता लगावला. उंदीर आणि टोपीची उपमा देत दीपक केसरकर यांची राणेंवर निशाणा साधला.
“ज्याची साधी मुख्यमंत्री कार्यालयात स्टाफ म्हणून काम करण्याची पात्रता नाही, अशा माणसाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री केले. ते आज उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका करतात, त्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची पात्रता आहे का?” असा प्रश्नही केसरकरांनी उपस्थित केला. अशा लोकांकडे उद्धव ठाकरे यांनी लक्ष देऊ नये, असंही केसरकर म्हणाले. (Nilesh Rane hits back at Deepak Kesarkar criticism on Narayan Rane)
Video| उंदीर व टोपीची उपमा देत आमदार दिपक केसरकर यांची राणेंवर जहरी टीका – TV9 @MeNarayanRane pic.twitter.com/jDaq77WaH0
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 1, 2020
संबंधित बातम्या :
उद्धव ठाकरे म्हणाले होते, कुठल्याही पक्षात जा, तुला निवडून आणण्याची जबाबदारी माझी : केसरकर
केसरकर शिवसेनेत आलेले आयत्या बिळावरचे नागोबा, राणेंवरील केसरकरांच्या टीकेला भाजपचे उत्तर
(Nilesh Rane hits back at Deepak Kesarkar criticism on Narayan Rane)