मनोज लेले, प्रतिनिधी, रत्नागिरी : निलेश राणे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्यावर टीका केली आहे. जयंत पाटील (Jayant Patil) हवेत गोळीबार करत असतात, असं निलेश राणे म्हणाले आहेत.तसंच भास्कर जाधव कार्टून आहेत, कोकणातील बिनकामाचा बैल आहे, अश्या शब्दात निलेश राणे (Nilesh Rane) यांनी टीका केली आहे.
भास्कर जाधव कार्टूनच आहे. आम्ही त्यांना बैल म्हणतो. तळ कोकणात त्यांना बिनकामाचा बैल म्हणतात. येत्या सोमवारी चिपळूण मध्ये सभा घेऊन भास्कर जाधव यांची पोलखोल करणार असंही निलेश राणे म्हणाले आहेत.
राष्ट्रवादी पक्षांना इतरांवा काही काम सोडलं आहेत का? कोण खुश कोण ना खुश यावर राष्ट्रवादीचे लक्ष आहे का? राष्ट्रवादी काँग्रेस बेरोजगार झाली का? सतत सरकारच्या कामावर बोलणं योग्य नाही. शिंदे-फडणवीस सरकार चांगलं काम करतंय.जयंत पाटील काहीही बोलत असतात. हवेत गोळीबार करत असतात, असं निलेश राणे म्हणालेत.
राष्ट्रवादीवाले अख्खा दिवस भाजपमध्ये काय चाललंय हेच बघत असतात,असंही ते म्हणाले आहेत.
अंधेरी पोट निवडणुकीमध्ये भाजपचाच विजय नक्की आहे. ठाकरे सरकार सुद्धा संख्याबळावरती होतं. संख्या होती म्हणून महाविकास आघाडीमधले सगळे कावळे एकत्र आले होते, असं म्हणत महाविकास आघाडीच्या स्थापनेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
अजित पवार सध्या विरोधी पक्ष नेते आहेत. त्यांना बिन पगाराच बोलावं लागतं, असं निलेश राणे म्हणाले आहेत. अजित पवार यांचा विरोधी पक्ष नेते म्हणून राज्यात प्रभाव नाही. म्हणून ते मध्ये-मध्ये काहीतरी बोलत असतात. अजित पवार यांची विरोधी पक्ष नेते म्हणून महाराष्ट्रात सध्या चर्चा नाही. सध्या राज्याला विरोधी पक्ष नेता आहे की नाही, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडल्याचं निलेश राणे म्हणाले.