रत्नागिरी : भाजप (BJP) नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. संख्याबळ आहे तोपर्यंत सर्व ठिक आहे. मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खरी परिस्थिती समोर येईल. जीथपर्यंत संख्याबळ आहे तिथपर्यंतच हे सरकार टीकेल असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. अजित पवारांवर निलेश राणे यांनी जोरदार निशाणा साधला आहे.
महाविकास आघाडी सरकार देखील संख्याबळ होतं म्हणूनच टीकलं होतं, ते दुसऱ्या एखाद्या फॉर्म्युल्यावर नव्हतं. संख्याबळासाठीच सर्व एकत्र आले होते. अजित पवार हे विरोधी पक्षनेते आहेत. त्यामुळे त्यांना असं बिनपगारी बोलावं लागतं. मात्र अजित पवार का बोलतात? कशासाठी बोलतात हे आम्हाला चांगलं माहित आहे. त्यांचा प्रभाव सध्या राहिलेला नाही. त्यामुळे अधून-मधून आठवण करून देण्यासाठी ते बोलत असतात असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान आगामी निवडणुकांमध्ये मुंबईत ठाकरे गटाला रोखण्याची जबाबदारी भाजपाकडून नारायण राणे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. यावर देखील निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. साहेब हे आमदार होण्यापूर्वी 1985 ला चेंबूरमधून नगरसेवक म्हणून निवडून आले. साहेबांची सुरुवातच शाखाप्रमुख म्हणून मुंबईतून झाली.
ते 1990 ला आमदार झाले. मात्र त्यांनी कायम आपलं लक्ष मुंबईकडे ठेवलं. मुंबईमध्ये त्यांना माणणारा एक वेगळा वर्ग आहे. त्यामुळे पक्षाकडून त्यांना जी जबाबदारी सोपवण्यात आली आहे, ती ते पूर्व करतील. मुंबई महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकेल याची मला खात्री आहे, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.