सिंधुदुर्ग : संतोष परब हल्ला प्रकरणात (Santosh Parab Attack Case) भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांना मोठा झटका बसल्याचं पाहायला मिळतंय. कारण, कणकवली न्यायालयाने नितेश राणे यांची अखेर दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत (Police Custody) रवानगी केली आहे. त्यानंतर नितेश राणे यांना कणकवली पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. दरम्यान, नितेश राणे यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आल्यानंतर आता भाजप आणि शिवसेना नेत्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. ठाकरे सरकार सूडबुद्धीने वागत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. दरम्यान, नितेश राणे यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आल्यानंतर संतोष परब हल्ला प्रकरण ते नितेश राणेंची कोठडीत रवानगी हा संपूर्ण घटनाक्रम जाणून घेणं गरजेचं आहे.
18 डिसेंबर – सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे स्थानिक नेते संतोष परब यांच्यावर हल्ला झाला. या हल्ल्यात आमदार नितेश राणे यांचाही समावेश असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला होता.
26 डिसेंबर – संतोष परब हल्ला प्रकरणात आमदार नितेश राणे यांच्याविरोधात शिवसेनेकडून गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावेळी नितेश राणे अचाकन अज्ञातवासात गेले.
30 डिसेंबर – सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर नितेश राणेंनी उच्च न्यायालयात धाव घेतली.
31 डिसेंबर – सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा निकाल लागला. त्यात शिवसेनला मोठा धक्का देत भाजपनं विजय संपादन केला.
13 जानेवारी – सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्या वेळी नितेश राणे अचानक सर्वांसमोर आले. त्यावेळी त्यांनी जिल्हा बँकेच्या नवनियुक्ती अध्यक्ष, उपाध्यक्ष यांना शुभेच्छा दिल्या. मात्र, संतोष परब हल्ला प्रकरणावर बोलणं टाळलं.
17 जानेवारी – नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावला. त्यानंतर नितेश राणे यांनी अटकपूर्व जामीनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
27 जानेवारी – नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळून लावला. मात्र, त्यावेळी त्यांना 10 दिवस अटकेपासून संरक्षण देण्यात आलं. तसंच त्यांना खालच्या कोर्टात शरण जाण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले.
28 जानेवारी – नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी रितसर अर्ज केला.
1 फेब्रुवारी – सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळला. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना 10 दिवस अटकेपासून संरक्षण देण्यात आलं. त्याच दिवशी रात्री नितेश राणे यांनी उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला.
2 फेब्रुवारी – उच्च न्यायालयात जामीनासाठी केलेला अर्ज नितेश राणेंनी मागे घेतला. तसंच दिवाणी न्यायालयात शरण गेले. तिथे सरकारी वकिलांकडून नितेश राणे यांच्या 10 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. मात्र, दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने नितेश राणे यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
इतर बातम्या :