मुंबई : पूजा चव्हाणच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणावरुन (Pooja Chavan Death Case) राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. “पूजा चव्हाणबद्दल आवाज उचल्यावर आमच्या सहकाऱ्यांना धमकीचे फोन येत आहेत. एखादा कॉल मलाही टाका ना” असं खुलं आव्हान भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केलं आहे. भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी धमकीचे फोन आल्याची तक्रार केली आहे. (Nitesh Rane challenges Shivsena for threat call in Pooja Chavan Death Case)
“पूजा चव्हाणबद्दल आवाज उचल्यावर धमकीचे फोन येत आहेत आमच्या सहकाऱ्यांना. एखादा कॉल मलाही टाका ना.. मला पण बघू दे शिवसेनेत कोण मर्द उरला आहे. वाट बघतो आहे !!!” असं ट्विट नितेश राणे यांनी केलं आहे.
नितेश राणे काय म्हणाले?
“मला फोन येत नाही, याचं दुःख झालं आहे. मलाही फोन करा, मलाही बरं वाटेल. माझा नंबरही देतो, घ्या फोन करा. फोन आला तर बाकीच्या गोष्टींवर मीही बोलू शकतो ना. एका मुलीला न्याय देण्यासाठी आमचा पक्ष जबाबदारी म्हणून पुढे येत आहे. सरकार न्याय देत नाही” अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना दिली.
पूजा चव्हाण बद्दल आवाज उचल्यावर धमकीचे फोन येत आहेत आमच्या सहकाऱ्यांना..
एखादा कॉल मला ही टाका ना..
मला पण बघू दे शिवसेनेत कोण मर्द उरला आहे..
वाट बघतो आहे !!! ??— nitesh rane (@NiteshNRane) February 15, 2021
काँग्रेस-शिवसेनेवर टीकास्त्र
“काँग्रेस आणि शिवसेनेचे नेते दिशा रवीबद्दल ट्विट करण्यात व्यस्त आहेत, मात्र बीडच्या पूजा चव्हाण या तरुणीच्या संशयास्पद मृत्यूविषयी एक चकार शब्दही त्यांना काढायचा नाही. त्यांचा मंत्री या प्रकरणात मुख्य संशयित आहे. दुटप्पी भूमिका” असे ट्विट नितेश राणेंनी याआधी केले होते.
All the Congress and Shiv Sena leaders busy tweetin about #DishaRavi but they don’t want to utter a word abt this young girl Puja Chavan from Beed who died a mysterious death n their own minister is the prime suspect!
Is it not cool enough to trend?
Hypocrites!— nitesh rane (@NiteshNRane) February 15, 2021
माधव भांडारींचा हल्लाबोल
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन भाजपने ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. या प्रकरणात ज्या बाबी समोर येत आहेत, त्या सर्वांची कायद्याच्या योग्य यंत्रणेकडून शहानिशा करुन सत्य बाहेर काढण्याची जबाबदारी सरकारची आहे. मात्र ही जबाबदारी सरकारने घेतली की नाही, हे अद्याप स्पष्ट नाही, असं सांगत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी टीकास्त्र सोडलं.
हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे. राज्यातील एका मंत्र्याचे नाव येणं हे अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन सत्य बाहेर येणं आवश्यक आहे. जे गुन्हेगार असतील, त्यांच्यावर कारवाई व्हावी, ऑडिओ क्लिपची तपासणी योग्य यंत्रणेकडून झाली पाहिजे, असं सांगत माधव भांडारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टार्गेट केलं. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात पुढाकार घेऊन चौकशी कशा पद्धतीने होणार हे सांगणे आवश्यक आहे, पण चौकशी अजून जाहीर झालेली दिसत नाही, असं सांगत माधव भांडारी यांनी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
चित्रा वाघ यांना धमकीचे फोन
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी रोखठोक भूमिका मांडणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांना धमकीचे फोन आल्याचा दावा केला जात आहे. याबाबत चित्रा वाघ यांनी स्वत: ट्विट करत माहिती दिली होती. चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी शिवसेना नेते आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचं नाव घेऊन गंभीर आरोप केला होता. या प्रकरणी सुरुवातीला दबक्या आवाजात मंत्री राठोड यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, वाघ यांनी थेट सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांसमोर येऊन संजय राठोड यांचं नाव घेतलं. त्यामुळे वाघ यांना धमकीचा फोन आल्याचं बोललं जातं.
धमक्यांना घाबरणारी चित्रा वाघ अजिबात नाही त्यामुळे उगा मला फोनकरून वेळ वाया घालवू नका माझ्या भावड्यांनो
जिथे जिथे महिलांवर अन्याय अत्याचार होणार तिथे तिथे नडणार आणि भिडणारचं?@BJP4Maharashtra @MumbaiPolice @MahaPolice
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) February 14, 2021
पाहा व्हिडीओ :
संबंधित बातम्या :
पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात ट्विस्ट, पूजावर 13 लाखांच्या कर्जाचा बोजा, आता SBI म्हणते….
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी मंत्री संजय राठोड यांच्यावर थेट आरोप, चित्रा वाघांना धमकीचे फोन
(Nitesh Rane challenges Shivsena for threat call in Pooja Chavan Death Case)