उस्मानाबादः आक्रमक स्वभाव व रोखठोक वक्तव्य यामुळे नेहमी चर्चेत असलेल्या राणे परिवाराचा प्रेमळ स्वभाव आज तुळजाभवानी मंदिरात समोर आला. एका पित्याचे (Father) आपल्या पुत्राविषयीं प्रेम काळजी काय असते, हे नितेश राणे यांच्या रूपाने दिसून आले. उस्मानाबादेत आमदार नितेश राणे हे सहकुटुंब तुळजाभवानी (Tuljabhavani, Osmanabad) दर्शनासाठी आले होते यावेळी त्याचे पुत्र उन्ह , गर्दी व धावपळ यामुळे चक्कर आली आणि तो थकला. यावेळी नितेश राणे (Nithesh Rane) यांनी स्वतःच्या खांद्यावर घेत मंदिरातून बाहेर आणले. सुरक्षा रक्षक , कार्यकर्ते असतानाही त्यांनी मुलाला दुसऱ्याच्या हातात न देता स्वतः कडेवर घेतले. इतरांनी त्यांच्या मुलाला कडेवर घेण्याची तयारीही दर्शवली, मात्र आपल्या मुलाला त्यांनी स्वतःच कडेवर घेतले. काही वेळ ते तसेच चालत राहिले.. नितेश राणेंचे हे पुत्रप्रेम उपस्थितांनाही भावून करून गेले.
एरव्ही आक्रमक चेहरा असलेले नितेश राणे यांच्या पुत्र प्रेम पाहून सर्वजण भावनिक असले, राणेच्या पुत्रप्रेमाची चर्चा तुळजापुरात चांगलीच रंगली. नितेश राणे यांनी सहकुटुंब आज तुळजापूर येथील भवानी मातेचे दर्शन घेतले. तसेच देवीची आरतीही केली. यावेळी भक्तीभावाने देवीची आराधना केली. नितेश राणेंचा यावेळचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आक्रमक राणे कुटुंबीयाचे पुत्र प्रेम, Nitesh Rane जेव्हा बापाच्या भूमिकेत जातात… pic.twitter.com/j0wwzGq1yc
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 21, 2022
नितेश राणे यांनी तुळजापुरात सहकुटुंब देवीची आरती केली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, सुधीर पाटील, सुनील काकडे, नगराध्यक्ष सचिन रोचकरी,उप नगराध्यक्ष अभय इंगळे, ओम नाईकवाडी,विनोद गपाट, सचिन पाटील, गुलचंद व्यवहारे, संतोष बोबडे, शिवाजी बोधले, पुजारी राम छत्रे उपस्थित होते. तहसीलदार सौदागर तांदळे , मंदिर जनसंपर्क अधिकारी तथा धार्मिक व्यवस्थापक नागेश शितोळे यांनी राणे कुटुंबाचा सत्कार केला.
इतर बातम्या