सिंधुदुर्ग : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane News) यांनी कोकणात शेती केली. सर्वसामान्य शेतकऱ्यांसोबत त्यांनी भात लावणी केली. नांगर चालवला. गुरं हाकली. नंतर शेतातच न्याहारीही केली. भाजप आमदार नितेश राणे यांनी विधानसभेच्या (Vidhan Sabha) पायऱ्यांवरुन काढलेला म्यॅव म्यॅवचा आवाज प्रचंड गाजला होता. त्यानंतर आता त्यांनी शेती करताना गुरांना हाकताना काढलेला आवाजही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडीओ आता प्रचंड व्हायरल होतो आहे. सिंधुदुर्ग (Sindhudurg News) जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांसोबत भात लावणीची कामं करताना नितेश राणे कॅमेऱ्यात कैद झालेत. सध्या कोकणाला पावसानं झोडपून काढलंय. तळकोकणात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे शेती-मशागतीच्या कामांनाही वेग आला आहे. कोकणात भात शेती मोठ्या प्रमाणात केली होती. दरम्यान, आता चक्क नितेश राणे यांनीही भातशेतीचं काम केल्याचं दिसून आलंय.
यावेळी नितेश राणेंनी शेतीचं काम करुन थकल्यानंतर शेतात बांधावरच न्याहारीही केली. त्याआधी बैल आणि छोट्या ट्रॅक्टरच्या मदतीने शेताची मशातही त्यांनी केली.
पारंपरिक गाण्यांच्या साथीत यावेळी नितेश राणे शेती करताना दिसून आले. यावेळी गावातील स्थानिख महिला आणि पुरुष शेतकऱ्यांसोबत त्यांनी शेतीकामात हातभार लावला.
दरम्यान, याआधी चिपळुणातील आमदार भास्कर जाधव हेदेखील शेतात काम करताना दिसून आले होते. पारंपरिक गाणी गात भात लावणीच्या गावात शिवसेना आमदार भास्कर जाधव यांचाही व्हिडीओ समोर आला होता.
सध्या कोकणात धुव्वाधार पाऊस सुरु आहे. नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. तर येत्या 48 तासांत मुसळधार पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुसळधार पावसाच्या हजेरीमुळे कोकणात कमालीचा गारवा पसरला आहे. तसंच शेतकरीही या पावसाने सुखावले आहेत.