मुंबई : दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा (Disha Salian Death Case) आज सीबीआय रिपोर्ट आला. त्यानंतर भाजप नेते नितेश राणे यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सीबीआयच्या निरीक्षणासाठी मी दोष देत नाही. कारण या घटनेनंतर 72 दिवसांनी सीबीआय दाखल झाली. 8 जूनपासून महाविकास आघाडी सरकारच्या मदतीने ‘क्लीन अप’ इतकं चांगलं केलं गेलंय की, सीबीआय आली तेव्हा त्यांच्या हाती फारसं काही लागलं नाही, असं नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले आहेत.
थोडक्यात दिशा सालियन मृत्यू प्रकरणाच्या सीबीआय रिपोर्टचा त्यांनी महाविकास आघाडीच्या कामाशी संबंध जोडला आहे.
I don’t blame the CBI for its observations in Disha Salains case.
CBI entered only after 72 days. From 8th June the “clean up” was done so well with the help of the MVA Gov that by the time the CBI entered nothing much could be recovered.
Master of all Cover ups!— nitesh rane (@NiteshNRane) November 23, 2022
दिशा सालियन मृत्यू प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. अनेक दावे प्रतिदावे केले गेले. तत्वकालिन विरोधी पक्ष भाजपने आदित्य ठाकरेंचा या प्रकरणासी संबंध जोडला. पण आता या प्रकरणाचा अहवाल समोर आला आहे. त्यावर नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दिशा सालियनचा मृत्यू अपघातीच असल्याचं सीबीआयनं आपल्या अहवालातून स्पष्ट केलंय. तसंच दिशाच्या मृत्यूचा सुशात सिंह राजपूत याच्या मृत्यूशीही संबंध जोडण्यात आला. पण आता या अहवाला दिशा सालियन मृत्यूप्रकरणाचा सुशांत सिंहच्या मृत्यूप्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय.