आव्हाडांच्या ‘त्या’ वक्तव्याला नितेश राणे यांचं आव्हान, औरंगजेबने पाडलेल्या मंदिरांची यादीच दिली…

| Updated on: Jan 04, 2023 | 2:42 PM

जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेबच्या बाबतीत एक विधान केलं. त्या विधानाला नितेश राणे यांनी उत्तर दिलं आहे. पाहा...

आव्हाडांच्या त्या वक्तव्याला नितेश राणे यांचं आव्हान, औरंगजेबने पाडलेल्या मंदिरांची यादीच दिली...
Follow us on

मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत विधान केलं. त्यावर वाद निर्माण झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी औरंगजेबच्या बाबतीत एक विधान केलं. यावरून पुन्हा एकदा वाद झाला. आव्हाडांच्या या विधानाला आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उत्तर दिलं आहे.

नितेश राणे यांचं पत्र जशास तसं

नितेश नारायण राणे
आमदार, कणकवली विधानसभा

मुंब्रारक्षक मा. जितेंद्र आव्हाडजी

वंदे मातरम!

आपण औरंग्याबाबाबत “औरंगजेब क्रूर असता तर विष्णूचं मंदिरही तोडलं असतं ना?” असे केलेले वक्तव्य स्वाभिविकच आहे, कारण आपले सर्वस्व यांची श्रद्धा औरंगजेबावर आहे हे केव्हाच सिद्ध झाले आहे।

कारण त्यांनी आपल्या तहआयुष्यात कधीही आमच्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवर एकदाही नतमस्तक केले नाही किंवा रायगडाच्या दिशेने त्यांचे कधी पाय वळाले नाही.

काकाप्रमाणे पुतण्यांही हिंदू धर्मासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे छत्रपती संभाजी महाराज हे ‘धर्मवीर नाहीत असे घोषीत करतो.

औरंगजेबाने धर्मांतर करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांना नरक यातना दिल्या तरी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदूधर्मासाठी बलिदान दिले.

आपल्या माहितीकरता मी आपल्याला या पत्रासोबत औरंग्याने तोडलेल्या हिंदू मंदीरांची यादी देत आहे. मला खात्री आहे, आपण हे तथ्य आपल्या मुघलशाहीच्या आस्थेपोटी स्वीकारणार नाही.

|| जय जिजाऊ, जय शिवराय ||

औरंग्याने आपल्या आयुष्यामध्ये लहान मंदिरे खूप तोडलेली आहेत पण प्रामुख्याने जी मोठी मंदिरे त्याने तोडली आहेत त्याची यादी खाली नमूद केलेली आहेत.

१) सोमनाथ मंदीर

२) कृष्ण जन्मभूमी मंदीर

३) काशी विश्वनाथ मंदीर

४) विशश्वर मंदीर

५) गोविंददेव मंदीर

६) विजय मंदीर

७) भीमादेवी मंदीर

८) मदन मोहन मंदीर

९) चौषष्ठ योगिनी मंदीर

१०) एलोरो मंदीर

११) त्र्यंबकेश्वर मंदीर

१२) नरसिंगपूर मंदीर

१३) पंढरपूर मंदीर

आपला,

नितेश राणे

विधानसभा सदस्य