Arnab Goswami Arrest : हिसाब होगा, इंटरेस्ट लगाके, नितेश राणेंचा ठाकरे सरकारला अप्रत्यक्ष इशारा

| Updated on: Nov 04, 2020 | 10:47 AM

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात पनवेल पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामींना बेड्या ठोकल्या आहेत

Arnab Goswami Arrest : हिसाब होगा, इंटरेस्ट लगाके, नितेश राणेंचा ठाकरे सरकारला अप्रत्यक्ष इशारा
Follow us on

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी अटक केल्यानंतर ठाकरे सरकार विरुद्ध भाजप असे दोन गट पडल्याचे चित्र आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात गोस्वामींना बेड्या ठोकल्यानंतर भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र डागलं आहे. त्यातच भाजप आमदार नितेश राणे यांनी “हिसाब तो होगा, इंटरेस्ट लगाके” असं ट्वीट करत ठाकरे सरकारवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. (Nitesh Rane slams Thackeray Government over Arnab Goswami Arrest)

“सत्ता आज है, कल नही… आज तुम्हारी है… कल हमारी होगी.. बस इतना याद रखना… हिसाब तो होगा.. इंटरेस्ट लगा के” (सत्ता आज आहे, उद्या नसेल… आज तुमची आहे… उद्या आमची असेल.. फक्त इतकंच लक्षात ठेवा, हिशेब होणार.. व्याजासकट) असं ट्वीट नितेश राणे यांनी केलं आहे. या ट्वीटमध्ये नितेश राणेंनी कोणालाही मेन्शन केलेलं नाही, किंवा कोणाचं नावही घेतलेलं नाही. मात्र अर्णव गोस्वामींच्या अटकेनंतर अवघ्या काही मिनिटांत हे ट्वीट केल्याने त्याच्याशी संबंध जोडला जात आहे.

पनवेल पोलीस अर्णव गोस्वामींच्या चौकशीसाठी आज सकाळी (4 नोव्हेंबर) घरी पोहोचले. यावेळी गोस्वामींनी पोलिसांशी दीड तास हुज्जत घातली. त्यानंतर पोलिसांनी अर्णव यांनी अटक केली. या प्रकरणी अनेक आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण नेमकं काय?

मुंबईतील सुप्रसिद्ध इंटिरिअर डिझायनर अन्वय नाईक (53) यांनी शनिवारी 5 मे 2018 रोजी अलिबाग येथील कावीर गावातील राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्याच ठिकाणी त्यांची आई कुमुद नाईक (84) यांचाही मृतदेह आढळून आला होता. तसेच त्यांनी सुसाईड नोटही लिहून ठेवली होती.

अन्वय नाईक हे इंटिरिअर डिझाईनर होते. कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक होते. अन्वय यांच्या कॉनकॉर्ड कंपनीने रिपब्लिक टीव्हीचे अर्णव गोस्वामी, स्काय मीडियाचे फिरोज शेख आणि स्मार्ट वर्क्स कंपनीचे नितेश सरडा यांच्यासाठी डिझाईनिंगचे काम केले होते. (Nitesh Rane slams Thackeray Government over Arnab Goswami Arrest)

काम पूर्ण झाल्यानतंरही नाईक यांना त्यांच्या कामाचे पैसे मिळाले नव्हते. कामाचे पैसे मिळवण्यासाठी अन्वय यांनी सातत्याने अर्णव गोस्वामींसह इतरांना विनंती केली होती. मात्र अर्णव गोस्वामी, फिरोज शेख आणि नितेश सरडा त्यांना पैसे देण्यास टाळाटाळ करत होते, असा आरोप आहे.

दुसरीकडे, अन्वय यांनी ज्या व्यापारी, व्यावसायिकांकडून या कामासाठी माल घेतला होता, त्यांनीही पैशाचा तगादा लावला होता. पण कामाचे पैसे न मिळाल्याने अन्वय यांना नैराश्य आलं होतं. याच नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे.

अन्वय नाईक यांच्या कंपनीनं अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक टीव्हीचा स्टुडिओ उभारला होता. याच कामाचे अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवल्यानं अन्वय नाईक यांनी आत्महत्येचं पाऊल उचलल्याचा आरोप पत्नी अक्षता नाईक यांनी केला आहे.

अन्वय यांनी त्यांच्या आत्महत्येपूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यात त्यांनी रिपब्लिक टीव्हीचे अर्णव गोस्वामी, स्काय मीडियाचे फिरोज शेख आणि स्मार्ट वर्क्स कंपनीचे नितेश सरडा यांची नावं लिहिली होती. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

रायगड पोलिसांसाठी अन्वय यांच्या कॉनकॉर्ड डिझायनर कंपनीच्या विविध कार्यालयांची तपासणी केली होती. तसेच ही हायप्रोफाईल केस असल्याने तपासासाठी अधिकारी आणि कर्मचारी यांचे विशेष तपास पथक तयार केले. सुसाईड नोटमध्ये नमूद केलेल्या आर्थिक व्यवहारांची खातरजमा करण्यासाठी हे तपास पथक अन्वय यांच्या मुंबईतील कार्यालयाची तपासणी केली.

संबंधित बातम्या :

प्रसिद्ध इंटिरिअर डिझायनर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण नेमकं काय?

अर्णव गोस्वामीवरील कारवाई पोलिसांकडून, राज्य सरकारचा संबंध नाही, संजय राऊतांकडून स्पष्ट

पोलिसांचा दुरुपयोग करत महाराष्ट्र सरकारकडून राज्यात अघोषित आणीबाणी, भाजपचा गंभीर आरोप

(Nitesh Rane slams Thackeray Government over Arnab Goswami Arrest)