Nitin Gadkari : नाही तर होर्डिंग्जवर आमचे फोटो उंदरासारखे लावून स्वत:चे मोठे फोटो लावतात, गडकरींनी सांगितले उत्साही कार्यकर्त्यांचे किस्से

| Updated on: Jul 24, 2022 | 3:38 PM

Nitin Gadkari : गिरीश गांधी यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात गडकरी बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक किस्से ऐकवले. मी सोलापूरला होतो. एका नेत्याने गावभर पोस्टर लावली. ज्याने पोस्टर लावले त्याचं जनतेशी काही घेणं देणं नव्हतं.

Nitin Gadkari : नाही तर होर्डिंग्जवर आमचे फोटो उंदरासारखे लावून स्वत:चे मोठे फोटो लावतात, गडकरींनी सांगितले उत्साही कार्यकर्त्यांचे किस्से
सायरस मिस्त्रींच्या मृत्यूनंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नागपूर : सर्वच पक्षातील कार्यकर्ते (party workers) कशा पद्धतीने वागतात याची नमुनेदार उदाहरणे केंद्रीय पर्यावरण मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) यांनी सांगितली. मी आजपर्यंत कुणालाही हार किंवा गुच्छ देण्यासाठी माझे शंभर रुपये खर्च केले नाही आणि करणार नाही. मी कुणाचं कटआऊट लावत नाही. माझंही लावत नाही. मला लोकं म्हणतात, तुमच्या कटाऊटमध्ये माझा फोटो नाही. मी म्हणतो, तुमचा कटआऊटमध्ये फोटो लावून फायदा नसेल म्हणून लावला नाही. तुम्ही कशाला चिंता करता? ज्या दिवशी त्याला कळतं यांचा फोटो लावून आपल्याला मतं मिळणार आहे. त्या दिवशी तो माझा फोटो पहिला लावतो. नाही तर एरव्ही कटआऊटवर उंदरासारखे आमचे फोटो लावतात आणि खाली आपला मोठा फोटो लावतात, असा चिमटा नितीन गडकरी यांनी काढला. निमित्त होतं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश गांधी (girish gandhi) यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताच्या कार्यक्रमाचे.

गिरीश गांधी यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात गडकरी बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक किस्से ऐकवले. मी सोलापूरला होतो. एका नेत्याने गावभर पोस्टर लावली. ज्याने पोस्टर लावले त्याचं जनतेशी काही घेणं देणं नव्हतं. त्यामुळे एकाने आज हमारे टॉमी का भी जन्म दिन आहे म्हणून गावात पोस्टर लावली. त्यामुळे खजिल झालेल्या त्या व्यक्तीने आपली पोस्टर काढून टाकली होती, असा किस्सा गडकरी यांनी सांगताच एकच हशा पिकला.

हे सुद्धा वाचा

पहिल्यांदा स्वखर्चाने हार घेतला

अटल बहादूर सिंग आज नाहीत. लता मंगेशकर यांचा सत्कार ठरला होता. तेव्हा कुंदाताई महापौर होत्या. मी पालकमंत्री होतो. त्यावेळी लतादीदींनी नागपूरला जायचंच नाही असं ठरवलं होतं. मी त्यांना मलबार हिलला जाऊन अनेकदा नागपूरला येण्याची विनंती केली. हृदयनाथ मंगेशकर यांच्या माध्यमातून विनंती केली. आमचा आग्रह त्यांनी मानला. त्या नागपुरात आल्या. सुंदर सत्कार झाला. त्यांच्या गळ्यात हार घालायचा होता. अनेकजण हार घालत होते. तेव्हा पहिल्यांदा माझ्या पॉकिटात हात घालून स्वखर्चाने लता मंगेशकरांसाठी मी हार आणला. त्याचा आनंद वेगळा होता. त्यानंतर मी कधीच कुणासाठी स्वत:च्या खर्चाने हार आणला नाही आणि आणणारही नाही, असं ते म्हणाले.

राजकारणात काय घडेल सांगता येत नाही

माणसाच्या कर्तृत्वाचा निवडून येण्याशी काही संबंध नाही. वेगवेगळ्या प्रकारचे लोक निवडून येतात. राजकारणात केव्हा काय होईल हे सांगता येत नाही, असं सांगतानाच निवडणुकीत गाड्या भरून भरून आणलेले लोक भाषणाला टाळ्याही वाजवत नाहीत. त्यांच्यासाठी जेवणाची काय व्यवस्था आहे याकडे त्यांचे लक्ष असते, असंही ते म्हणाले.