बच्चन मला म्हणाले, तुम्ही तरुण दिसता, मग गडकरींनी काय उत्तर दिलं? वाचा

| Updated on: Oct 03, 2021 | 9:11 PM

नितीन गडकरी यांच्या हस्ते आज नाशिकच्या पंचवटीतील पंडित दिनदयाळ उपाध्याय थीम पार्कचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी नितीन गडकरी यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. त्यासह गडकरी यांनी बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा एक किस्साही सांगितला.

बच्चन मला म्हणाले, तुम्ही तरुण दिसता, मग गडकरींनी काय उत्तर दिलं? वाचा
नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री
Follow us on

नाशिक : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज नाशिकच्या पंचवटीतील पंडित दिनदयाळ उपाध्याय थीम पार्कचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्यासह भाजपचे अनेक नेते उपस्थित होते. भाजप नगरसेविका प्रियंका माने यांच्या निधीतून हे भव्य थीम पार्क साकारण्यात आलं आहे. यावेळी नितीन गडकरी यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. त्यासह गडकरी यांनी बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा एक किस्साही सांगितला. (Nitin Gadkari shared his story with actor Amitabh Bachchan)

‘आज एनडीटीव्हीच्या कार्यक्रमात मी आणि अमिताभ बच्चन सोबत होतो. त्यावेळी बच्चन मला म्हणाले की तुम्ही तरुण दिसत आहात. तेव्हा त्यांना सांगितलं की मी रोज एक तास प्राणायाम करतो’. हा किस्सा सांगून गडकरींनी प्राणायामांचं महत्व उपस्थितांना सांगितलं. प्रदुषणमुक्त हवा मिळाली तर आपल्याला डॉक्टरची गरज लागणार नाही, असंही गडकरी म्हणाले.

नाशिकला येताना गडकरींच्या पत्नी काय म्हणाल्या?

गडकरी यांनी यावेळी अजून एक किस्सा सांगितला. नाशिकला येताना गडकरी यांच्यासोबत त्यांच्या पत्नीही होत्या. ‘माझी पत्नी विमानात सोबहत होती. ती म्हणत होती की नाशिकची शेती किती सुंदर आहे. गोदावरी सुंदर आहे, हवामान मस्त आहे’. नाशिक ग्रीन आणि सुंदर आहे, ते असंच राहावं. याबाबत महापौर आणि महापालिका आयुक्तांनी अभ्यास करावा, असा सल्लाही गडकरी यांनी यावेळी दिलाय.

‘5 वर्षात नागपूर ध्वनी, जल, वायू प्रदूषणमुक्त करणार’

येत्या 5 वर्षात नागपूर ध्वनी, जल आणि वायू प्रदूषणमुक्त करेल, असा दावाही गडकरी यांनी आज नाशिकमध्ये केलाय. प्रत्येक शहराच्या महापौर आणि आयुक्तांनी ठरवल्यास याबाबत आपण पुढे जाऊ. सर्व ध्वनी प्रदूषणाला मी जबाबदार मी आहे. त्यामुळे मी नेते, अधिकाऱ्यांच्या गाडीवरील लाल दिवे मी बंद केले. त्यामुळे बरेच जण माझ्यावर नाराजही आहेत. आता मी कायदा करणार आहे की मर्सिडीज, बीएमडब्ल्यू कोणतीही कार असो कर्कश आवाज चालणार नाही. रुग्णवाहिका आणि पोलिसांच्या गाड्यांचाही कर्कश आवाज चालणार नाही. या गाड्यांवर भारतीय वाद्य वाजवण्याचा विचार असल्याचंही यावेळी गडकरींनी सांगितलं.

नाशिकमधील कोणत्या दोन गोष्टी गडकरींना आवडल्या?

नितीन गडकरी यांना महाराष्ट्रातील शहरांच्या भौगोलिक परिस्थितीचं त्यांना उत्तम ज्ञान आहे. यावेळी बोलताना त्यांनी नाशिक शहराच्या वैशिष्यांबद्दल सांगितलं. नाशिकमध्ये दोन गोष्टी मला खूप आवडल्या. नाशिक सारख्या अभ्यासिका भारतात कुठेही नाहीत. इथले हवामान आमच्या नागपुरमध्येही नाही. येथील कार्यालये, त्यांना असलेली पार्किंग अतिशय उत्तम आहे. नाशिक ग्रीन आणि सुंदर असेच रहावे, असे नितीन गडकरी म्हणाले.

इतर बातम्या :

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एक दिवसाची पोलीस कोठडी, कोर्टात नेमकं काय-काय घडलं?

पंकजा मुंडे आजारी, विरोधी पक्षनेत्यांचा बीड जिल्ह्यातील पाहणी दौरा रद्द!

Nitin Gadkari shared his story with actor Amitabh Bachchan