Nitin Raut | विरोधी पक्षाकडून महाराष्ट्राची प्रगती रोखण्याचा प्रयत्न, नितीन राऊतांचे भाजपवर टीकास्त्र

| Updated on: Nov 27, 2020 | 2:02 PM

महाराष्ट्राच्या प्रगतीला रोख लावण्याचं काम विरोधी पक्षांकडून होत असल्याची टीका नितीन राऊतांनी केली. Nitin Raut criticize BJP

Nitin Raut | विरोधी पक्षाकडून महाराष्ट्राची प्रगती रोखण्याचा प्रयत्न, नितीन राऊतांचे भाजपवर टीकास्त्र
Follow us on

नागपूर: महाराष्ट्राच्या प्रगतीला रोख लावण्याचं काम विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे, ते योग्य नाही, अशी टीका ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली आहे. वीजबिलांबाबत तीन लाखांच्यावर तक्रारी आल्या त्यांचे निरसन करण्याचं काम केलं आहे. आताही कोण वीज कंपनीकडे आले तर त्यांची बिलं दुरुस्त करण्यात येतील. ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, त्यांना दोन ते तीन टप्प्यात बिल भरण्याची सोय करण्यात आली आहे. (Nitin Raut criticize BJP)

राज्यामध्ये 24 तास वीज पुरवठा करणं आमचं काम आहे. त्यानुसार वीज वापरली असेल तर ते भरणे ग्राहकांचं काम आहे. तसं झालं तर आम्हीही 24 तास वीज पुरवठा करतोय. आम्ही वीज कनेक्शन कापणार नाही, असं नितीन राऊत यांनी स्पष्ट केले.

भविष्यात महावितरणच्या वीज बिलातील त्रुटी दूर करण्यासाठी महावितरण लवकरच पोस्टपेड आणि प्रीपेड मिटर देणार आहोत. प्रीपेड-पोस्टपेड मोबाईलप्रमाणेच हे स्मार्ट वीज मीटर काम करणार आहे, अशी माहिती ऊर्जामंत्री डॅा. नितीन राऊत यांनी दिली.

100 युनिटपर्यंत वीजबिल माफीचा मुद्द राज्य सरकारकडे प्रलंबित आहे. राज्याची आर्थिक परिस्थिती कोरोना काळात बिघडल्यानं मंत्रिमंडळापुढं 100 युनिट पर्यंतच्या वीजबिल माफीचा प्रस्ताव प्रलंबित असल्याची माहिती, नितीन राऊत यांनी दिली. वीज बिल माफीचा निर्णय उर्जा मंत्री घेत नाहीत तर राज्य मंत्रिमंडळ घेते, असं स्पष्टीकरण राऊत यांनी दिले. (Nitin Raut criticize BJP)

वीजबिल माफी करणारांनी बिलं भरली

लॉकडाऊन काळात ग्राहकांना देण्यात आलेली 69 टक्के वीजबिल भरली आहेत. वीज बिल माफीची मागणी करणारे नेते मनसे अध्यक्ष राज ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही वीज बिलं भरलं आहे, असंही नितीन राऊत म्हणाले.

महाविकास आघाडी सरकारला 1 वर्ष पूर्ण 

महाविकास आघाडी सरकरामध्ये काँग्रेसची कोणत्याही प्रकारची दुय्यम प्रकारची भूमिका स्वीकारली नाही. काँग्रेसच्या प्रस्तावांना मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मंजुरी दिली आहे. विरोधी पक्षांनी त्यांच्या अनुभवाचा फायदा राज्याच्या विकासासाठी करण्यासाठी सहकार्य करण्याची भूमिका ठेवावी, असं नितीन राऊत म्हणाले.


संबंधित बातम्या : 

…म्हणून स्वतःची वीजबिले भरणाऱ्या भाजप आमदारांचे आभार, नितीन राऊतांचा टोला

‘भाजपचा अभिमान तोडायचा आहे’, नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणूक प्रचारात नितीन राऊतांचा हल्लाबोल

Nitin Raut | “वीजबिल माफीबाबत सरकार गंभीर” : उर्जामंत्री नितीन राऊत

(Nitin Raut criticize BJP)