कोल्हापूर-सागंली महापुराच्या निकषानुसार शेतकऱ्यांना मदत : नितीन राऊत

| Updated on: Oct 17, 2020 | 1:05 PM

शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथे महापूरावेळी लावण्यात आलेल्या निकषांचा वापर करण्यात येणार आहे. त्या निकषांनुसार मदत करण्यात येईल, असे राऊत यांनी सांगितले. Nitin Raut said govt should gave compensation to farmers on criteria of kolhapur sangli flood

कोल्हापूर-सागंली महापुराच्या निकषानुसार शेतकऱ्यांना मदत : नितीन राऊत
Follow us on

नवी दिल्ली: महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना मदत देण्याचे काम सुरू केले आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीचं पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसानाचा अहवाल सादर केल्यानंतर शेतकऱ्यांना प्रथम खावटी आणि त्यानंतर तात्काळ नुकसान भरपाई देण्यात येईल, अशी माहिती ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिली. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथे महापुरावेळी लावण्यात आलेल्या निकषांचा वापर करण्यात येणार आहे. त्या निकषांनुसार मदत करण्यात येईल, असे राऊत यांनी सांगितले. (Nitin Raut said govt should gave compensation to farmers on criteria of kolhapur sangli flood)

महाज्योती स्वायतत्ता

महाज्योतीबाबत मंत्रीमंडळात चर्चा झाली आहे. येत्या मंत्रीमंडळ बैठकीत महाज्योतीला निधी देण्याबाबत निर्णय घेतला जाईल. महाज्योतीच्या घटनेत स्वायतत्ता नमूद आहे. मात्र, शासन निधी देत असल्यानं त्यावर नियंत्रण राहणार असल्याचं नितीन राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

मुंबईतील बत्ती गुल प्रकरण

मुंबईमधील बत्तीगुल प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली आहे. समितीचा अहवाल आल्यानंतर घातपात होता की इतर कोणते कारण होते हे समोर येईल मात्र, घातपाताची शक्यता नाकारता येत नाही, असे नितीन राऊत यांनी सांगितले. उच्चस्तरीय समितीचा अहवाल मंत्रीमंडळासमोर मांडण्यात येईल आणि त्यानंतर बत्तीगुल प्रकरणावर बोलता येईल, असे नितीन राऊत यांनी म्हटले.

दरम्यान , अतिवृष्टीमुळे  उस्मानाबाद , सोलापूर आणि पंढरपुरात शेतीचे नुकसान झाले आहे. आम्ही शेतकऱ्यांना मदत करणार आहे. पण केंद्र सरकारने मदत केली पाहिजे,अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.  केंद्राकडून पाहिजे त्या प्रमाणात मदत मिळत नाही. असेही थोरात म्हणाले.

संबंधित बातम्या :

मुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टी झालेल्या भागांचा प्रत्यक्ष दौरा करावा, लोकांना दिलासा मिळेल- प्रकाश आंबेडकर

अतिवृष्टीनंतर शरद पवार मराठवाड्याच्या दौऱ्यावर, तर अजितदादा बारामतीत

(Nitin Raut said govt should gave compensation to farmers on criteria of kolhapur sangli flood)