बिहार विधानसभा निवडणुकीतील तीन कट्टर विरोधक एकत्र! काय आहे कारण?

| Updated on: Oct 21, 2020 | 8:22 AM

बिहार विधानसभा निवडणूक आता रंगात आली आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान आठ दिवसांवर येऊन ठेपलं आहे. अशावेळी तीन विरोधक एकत्र आल्याचं चित्र बिहारमध्ये पाहायला मिळालं. दिवंगत रामविलास पासवान यांच्या श्राद्धाच्या कार्यक्रमात नितीश कुमार, चिराग पासवान आणि तेजस्वी यादव एकत्र बसलेले दिसले.

बिहार विधानसभा निवडणुकीतील तीन कट्टर विरोधक एकत्र! काय आहे कारण?
chirag paswan nitish kumar tejaswi yadav together
Follow us on

पाटना: बिहार विधानसभा निवडणूक ऐन रंगात आली आहे. काँग्रेस आणि RJDची महाआघाडी, भाजप आणि JDUची युती तर पासवान यांच्या LJPमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळत आहे. सर्वपक्षीय नेत्यांकडून एकमेकांवर जोरदार हल्लाबोल सुरु आहे. मात्र अशावेळी एकमेकांसमोर दंड थोपटून उभे असलेले तीन विरोधक मंगळवारी एकत्र पाहायला मिळाले. LJPचे दिवगंत नेते रामविलास पासवान यांच्या श्राद्धाचा कार्यक्रम पक्ष कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला नितीश कुमार, तेजस्वी यादव आणि चिराग पासवान हे तिघे एकत्र पाहायला मिळाले. बिहार विधानसभा निवडणूक रंगात आली असताना तीन विरोधकांचा या कार्यक्रमातील एकत्र फोटो सध्या व्हायरल होत आहे. (Nitish Kumar, Chirag Paswan and Tejaswi Yadav togather before bihar assembly election)

रामविलास पासवान यांच्या श्राद्धाच्या कार्यक्रमाला बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल (संयुक्त)चे नेते नितीश कुमार संध्याकाळी आले होते. तेव्हा LJPचे अध्यक्ष चिराग पासवान हे नितीशकुमार यांच्या पाया पडले. पण या दोघांमध्ये काही संभाषण झालं नाही. काही वेळानंतर RJDचे नेते तेजस्वी यादवही या कार्यक्रमाला पोहोचले. त्यावेळी नितीश कुमार, चिराग पासवान आणि तेजस्वी यादव एकत्र बसलेले पाहायला मिळाले.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपलं आहे. निवडणूक प्रचारात चिराग पासवान आणि तेजस्वी यादव हे सातत्याने नितीश कुमारांवर हल्ला चढवताना पाहायला मिळत आहेत. अशावेळी हे तिन्ही विरोधक रामविलास पासवान यांच्या श्राद्धाच्या कार्यक्रमात एकत्र आले होते. मात्र, या तिघांमध्येही कुठल्याही प्रकारचा संवाद झालेला पाहायला मिळाला नाही.

ओपिनियन पोलमध्ये NDA ला बहुमत मिळण्याचा अंदाज

बिहार विधानसभा निवडणूक 3 टप्प्यांमध्ये पार पडणार आहे. हे तीन टप्पे 28 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर दरम्यान असतील. तर  10 नोव्हेंबरला निवडणूक निकाल जाहीर होणार आहे. याआधी बिहारच्या निवडणुकीवर केलेल्या ओपिनियन पोलमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) बहुमत मिळताना दिसत आहे. लोकनिती आणि CSDSच्या ओपिनियन पोलनुसार NDA ला 133-143 जागा मिळताना दिसत आहेत, तर महाआघाडीला 88-98 जागा मिळताना दिसत आहेत. NDA तून बाहेर पडलेल्या पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाला (LJP) 2 ते 6 जागा मिळताना दिसत आहेत. इतर पक्ष आणि अपक्ष 6-10 जागांवर मर्यादित राहिल असा अंदाज पोलमध्ये वर्तवण्यात आलाय.

संबंधित बातम्या:

Bihar Election 2020: भर सभेत राजद नेते तेजस्वी यादव यांच्यावर ‘चप्पल फेक’

बिहारमध्ये ‘JDU’ आणि ‘RJD’त 77 जागांवर थेट टक्कर, भाजपला फायदा होणार?

Nitish Kumar, Chirag Paswan and Tejaswi Yadav togather before bihar assembly election