नाशिक : राज्यातील अनेक महापालिकांच्या निवडणुका (municipal corporation election) जाहीर झाल्या आहेत. या निवडणुकांमध्ये (election) नाशिक (Nashik) महापालिकेचा देखील समावेश आहे. 2017 साली झालेल्या महापालिका निवडणुकीत नाशिक महापालिकेत भाजपाची एकहाती सत्ता आली होती. भाजपाचे एकूण 66 उमेदवार विजयी झाले होते. तर भाजपा पाठोपाठ महापालिकेत शिवसेनेचे संख्याबळ आहे. मात्र या निवडणुकीत मनसेला मोठा धक्का बसला. 2012 ला नाशिक महापालिकेत मनसेची सत्ता आली होती. मात्र 2017 ला मनसेच्या अवघ्या पाचच उमेदवारांना विजय मिळवता आला. नाशिकच्या प्रभाग क्रमांक दोन बाबत बोलायचे झाल्यास प्रभाग क्रमांक दोनच्या चारही जागेवर भाजपाच्या उमेदवारांचा विजय झाला होता. यंदा देखील भाजप आपला गड कायम राखणार का? हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रभाग क्रमाक दोन अ मधून पुनम सोनवणे या विजयी झाल्या होत्या. ब मधून सुरेश खेताडे हे विजयी झाले. क मधून उद्धव निमसे तर ड मधून भाजपाच्याच उमेदवार शितल माळोदे यांनी विजय मिळवला होता.
प्रभाग क्रमांक 2 मध्ये स्व. किशोर सुर्यवंशी मार्ग आणि बोरगड परिसराचा समावेश होते. यामध्ये किशोर सुर्यवंशी मार्ग, बोरगड परिसर, गोरक्षनगर, जुई नगर, ओंकार नगर, शिसमर्थ नगर, वृंदावन नगर, स्नेहनगर, प्रभातनगर, केतकी नगर, एकता नगर या प्रमुख भागांचा समावेश होतो.
प्रभाग क्रमांक 2 ची एकूण लोकसंख्या 36260 इतकी आहे. त्यापैकी अनुसूचित जातीचे एकूण मतदान 4344 एवढे आहे. तर अनुसूचित जमातीचे मतदान 6951 इतके आहे.
2017 मध्ये या प्रभागात चारही जागेवर भाजपाचे उमदेवार विजयी झाले होते. प्रभाग क्रमाक दोन अ मधून पुनम सोनवणे या विजयी झाल्या होत्या. ब मधून सुरेश खेताडे हे विजयी झाले. क मधून उद्धव निमसे तर ड मधून भाजपाच्याच उमेदवार शितल माळोदे यांनी विजय मिळवला होता.
महापालिका निवडणूक 2022 च्या आरक्षण सोडतीनुसार या प्रभागामध्ये वार्ड अ अनुसूचित जमाती महिला, वार्ड ब सर्वसाधारण महिला, तर वार्ड क हा सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी आरक्षीत आहे.
पक्ष | उमेदवार | विजय/ आघाडी |
---|---|---|
भाजप | ||
शिवसेना | ||
काँग्रेस | ||
मनसे | ||
राष्ट्रवादी | ||
इतर |
पक्ष | उमेदवार | विजयी/ आघाडी |
---|---|---|
भाजप | ||
शिवसेना | ||
काँग्रेस | ||
मनसे | ||
राष्ट्रवादी | ||
इतर |
पक्ष | उमेदवार | विजयी/ आघाडी |
---|---|---|
भाजप | ||
शिवसेना | ||
काँग्रेस | ||
मनसे | ||
राष्ट्रवादी | ||
इतर |
नाशिकमध्ये सध्या भाजपाचे 65 नगरसेवक आहेत. शिवसेनेचे 33 तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी 6 नगरसेवक आहेत. गेल्या महापालिका निवडणुकीत मनसेला मोठा धक्का बसला होता. मनसेला अवघ्या पाच नगरसेवकांवर समाधान मानावे लागले होते. तर भाजपाने मनसेला मात देत नाशिकमध्ये एकहाती सत्ता खेचून आणली.