नाशिक : नाशिक महापालिकेची (Nashik municipal corporation) निवडणूक जाहीर झाली आहे. आरक्षण सोडत देखील जाहीर करण्यात आली आहे. गेल्या वेळी भाजपाने (BJP) मनसेला (MNS) धोबीपछाड देत एक हाती सत्ता मिळवली होती. 2017 साली झालेल्या निवडणुकीत भाजप नंबर एकचा पक्ष ठरला होता. तर शिवसेने 33 जागांवर विजय मिळतव दुसरा क्रमांक प्राप्त केला होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी सहा जागा मिळाल्या होत्या, तर मनसेला अवघ्या पाच जागांवरच समाधान मानावे लागले होते. मात्र यंदा गेल्या काही दिवसांमध्ये ज्या राजकीय घडामोडी घडल्या त्यावरून नाशिक महापालिकेत नेमकं कोणता पक्ष बाजी मारणार हे आता सांगता येणं कठिण आहे. वार्ड नंबर 29 बाबत बोलायचे झाल्यास या वार्डमध्ये वडाळा गाव, इंदिरा नगर परिसराचा समावेश होतो. या वार्डमधून गेल्यावेळी तीन भाजपाचे तर एक शिवसेनाचा उमेदवार विजयी झाला होता.
प्रभाग क्रमांक 29 मध्ये साईनाथनगर, श्रीजयनगर, बजरंग सोसायटी, गजानन महाराज मंदिररोड परिसर, एस.बी.आय कॉलनी आदर्श कॉलनी, सीटी गार्डन परिसर, वडाळागांव, जेनिथ हॉस्पिटल, अशोका स्कूल या प्रमुख भागांचा समावेश होतो.
प्रभाग क्रमांक 29 ची एकूण लोकसंख्या ही 30471 एवढी आहे. त्यापैकी अनुसूचित जातीची एकूण लोकसंख्या 2117, तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 1369 इतकी आहे.
2017 मध्ये या प्रभागात चार पैकी तीन जागांवर भाजप विजयी झाले होते. तर एका जागेवर शिवसेनेने बाजी मारली होती. प्रभाग क्रमांक 29 अ मधून भाजपाच्या छाया देवांग या विजयी झाल्या. प्रभाग क्रमांक 29 ब मधून शिवसेनेच्या रत्नमाला राणे या विजयी झाल्या. प्रभाग क्रमांक 29 क मधून भाजपाचे उमेदवार मुकेश शहाणे हे विजयी झाले. तर ड मधून भाजपाचे निलेश ठाकरे यांनी बाजी मारली.
महापालिका निवडणूक 2022 च्या आरक्षण सोडतीनुसार या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 29 अ सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 29 ब सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 29 क सर्वसाधारण खुला असे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.
पक्ष | उमेदवार | विजयी/ आघाडी |
---|---|---|
भाजप | ||
शिवसेना | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
इतर |
पक्ष | उमदेवार | विजयी/ आघाडी |
---|---|---|
भाजप | ||
शिवसेना | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
इतर |
पक्ष | उमेदवार | विजयी/ आघाडी |
---|---|---|
भाजप | ||
शिवसेना | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
इतर |
भाजप- 65
शिवसेना – 33
राष्ट्रवादी – 06
काँग्रेस – 0 6
मनसे – 05