नागपूर : नागपूर महापालिकेवर गेल्या 15 वर्षांपासून भाजपची ( BJP) सत्ता आहे. 2017 च्या निवडणुकीत 108 जागांवर विजय मिळवत भाजपनं आपला झेंडा रोवला. गेल्या निवडणुकीत 29 जागांवर काँग्रेसचा, तर 10 जागांवर बसपचे उमेदवार (Candidates) निवडून आले. शिवसेनेला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले होते. राष्ट्रवादीचा फक्त एकच उमेदवार निवडून आला होता. प्रभाग 28 मध्ये गेल्या निवडणुकीत (Elections) दोन भाजपचे तर दोन शिवसेनेचे उमेदवार निवडून आले होते. यावेळी सीमांकन बदललं. प्रभाग 28 मधून तीन उमेदवार निवडून येणार आहेत.
वॉर्ड 28 मधून भाजपच्या दोन, तर शिवसेनेच्या दोन जागा निवडून आल्या होत्या. रेखा साकोरे व विजय झलके हे भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते. तर किशोर कुमेरिया व मंगला गवरे या शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते. कुमेरिया यांनी 14 हजार 696 मतं प्राप्त केली होती. गवरे यांनी 11 हजार 240 मतं प्राप्त केली होती. साकोरे यांनी 12 हजार 431 मत प्राप्त केली होती. तर झलके यांना 15 हजार 191 मतं मिळाली होती.
वॉर्ड 28 ची लोकसंख्या 44 हजार 935 आहे. त्यापैकी अनुसूचीत जातीची लोकसंख्या 9 हजार 487 आहे. तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 3 हजार 276 आहे. वॉर्ड क्रमांक 28 साठी अ अनुसूचित जाती, ब सर्वसाधारण महिला व क मधून सर्वसाधारण गटाचा उमेदवार निवडून येईल. वॉर्ड 28 ची व्याप्ती ही पारडी, भांडेवाडी रेल्वेस्टेशन, दैवीनगर, पवनशक्तीनगर, श्रवणनगर, वाठोडा, साईबाबानगर, कामाक्षीनगर, ऑरेंजनगर, अनमोलनगर, राधाकृष्णनगर, न्यू शारदानगर, नवीननगर, गिड्डोबा मंदिर परिसर, जय माँ वैष्णोदेवीनगर, अंतुजीनगर, अबुमियाँनगर, चांदमारी मंदिर या परिसरात आहे. पारडी दहन घाटाजवळील भंडारा रोडवरील नागनदीच्या पारडी पुलापासून पूर्वेकडे जाणाऱ्या भंडारा रोडने भंडारा रोडवरील गट्टानी सेवा निकेतनपर्यंतचा भाग आहे.
नागपूर महापालिका 2022 प्रभाग क्रमांक 28 अ
पक्ष | उमेदवार | विजयी आघाडी |
---|---|---|
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
शिवसेना | ||
बसपा | ||
इतर |
नागपूर महापालिका 2022 प्रभाग क्रमांक 28 ब
पक्ष | उमेदवार | विजयी आघाडी |
---|---|---|
भाजपा | ||
काँग्रेस | ||
शिवसेना | ||
राष्ट्रवादी | ||
बसपा | ||
इतर |
नागपूर महापालिका 2022 प्रभाग क्रमांक 28 क
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
भाजपा | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
शिवसेना | ||
बसपा | ||
इतर |